शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महापालिकेला ‘अल्टिमेटम’

By admin | Published: June 28, 2017 12:45 AM

औरंगाबाद : केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने शहरात शौचालये उभारण्याची योजना राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने शहरात शौचालये उभारण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत औरंगाबाद शहर खूपच मागे असून, ११ जुलैपर्यंत महापालिकेने १२ हजार शौचालये उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आदेश राज्य शासनातर्फे देण्यात आले आहेत. मनपा हद्दीत १२ हजार शौचालये उभारणीचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत ६ हजार कागदावर उभारण्यात आले आहेत. अनेक लाभार्थ्यांनी मनपाकडून पैसे तर घेतले, पण शौचालयांचे बांधकामच केलेले नाही. योजना पूर्ण करण्यासाठी बुधवारपासून महापालिका रस्त्यावर उतरणार आहे.महाराष्ट्रातील अनेक शहरांनी हगणदारीमुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण केले. मराठवाड्यात औरंगाबाद शहर खूपच मागे आहे. अलीकडेच शासनाने यासंदर्भात आढावा घेतला असता मनपाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ११ जुलैपर्यंत १२ हजार वैयक्तिक शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे बजावण्यात आले आहे. एक शौचालय उभारण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचे मिळून १२ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. शौचालयासाठी लाभार्थ्याची निवड होताच ६ हजार रुपये देण्यात येतात. लाभार्थ्याच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येते. शेकडो लाभार्थ्यांनी पहिल्या टप्प्यातील अनुदान मिळवून शौचालय उभारलेच नसल्याचे आता समोर येत आहे. वॉर्ड अधिकाऱ्यांनी अशा लाभार्थ्यांची यादी तयार करणे सुरू केले असून, एका वॉर्ड कार्यालयाअंतर्गत ५०० पेक्षा अधिक लाभार्थी आढळून आले आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचा विचारही मनपा प्रशासन करीत आहे.