शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

औरंगाबाद शहरात अनधिकृत मोबाईल टॉवर २९९ , कारवाई मात्र एकावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 11:51 PM

पुण्यात लोखंडी होर्डिंग कोसळून चार निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर औरंगाबाद शहरातील धोकादायक होर्डिंग, कमानी आणि अनधिकृत मोबाईल टॉवरचा मुद्या ऐरणीवर आला आहे. सोमवारी गादिया विहार परिसरातील शिवनगर येथील एक मोबाईल टॉवर सील करण्यात आले. अनधिकृत इमारतीवरील अनधिकृत टॉवरला सील लावा, अशी तक्रार या भागाच्या नगरसेविका स्मिता घोगरे यांनी प्रशासनाकडे केली होती. शहरात अद्यापही २९९ मोबाईल टॉवर अनधिकृत आहेत. यातील बहुतांश टॉवर गुंठेवारी भागातील अनधिकृत इमारतींवर आहेत. इमारतीची क्षमता नसतानाही हे टॉवर दिमाखात उभे आहेत.

ठळक मुद्देअन्य टॉवरला महापालिकेचे सततचे अभय का?

औरंगाबाद : पुण्यात लोखंडी होर्डिंग कोसळून चार निष्पाप नागरिकांचा जीव गेल्यानंतर औरंगाबाद शहरातील धोकादायक होर्डिंग, कमानी आणि अनधिकृत मोबाईल टॉवरचा मुद्या ऐरणीवर आला आहे. सोमवारी गादिया विहार परिसरातील शिवनगर येथील एक मोबाईल टॉवर सील करण्यात आले. अनधिकृत इमारतीवरील अनधिकृत टॉवरला सील लावा, अशी तक्रार या भागाच्या नगरसेविका स्मिता घोगरे यांनी प्रशासनाकडे केली होती. शहरात अद्यापही २९९ मोबाईल टॉवर अनधिकृत आहेत. यातील बहुतांश टॉवर गुंठेवारी भागातील अनधिकृत इमारतींवर आहेत. इमारतीची क्षमता नसतानाही हे टॉवर दिमाखात उभे आहेत.चिकलठाणा विमानतळाच्या आजूबाजूला अनेक अनधिकृत वसाहती आहेत. येथेही छोट्या-छोट्या इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. या टॉवरची उंची विमानतळासाठी डोकेदुखी ठरत आहे. विमानतळ प्राधिकरणाने पन्नास वेळेस मनपाकडे टॉवर काढण्याची मागणी केल्यानंतरही प्रशासन कारवाई करायला तयार नाही. जटवाडा रोड, पडेगाव, हर्सूल, जाधववाडी, शहानूरमियाँ दर्गा, शिवाजीनगर, सातारा-देवळाई, टाऊन हॉल, भावसिंगपुरा आदी भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत टॉवर उभारण्यात आले आहेत. इमारत मालकांसोबत करार करून मोबाईल कंपन्यांनी नियम धाब्यावर बसवून टॉवर उभारले आहेत. हे मोबाईल टॉवर दाट नागरी वसाहतींमध्ये आहेत. टॉवर कोसळल्यास अनेक निष्पाप नागरिकांचा जीव जाणार हे निश्चित.गादिया विहार परिसरातही अनधिकृत तीन मजली इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रार केल्यानंतरही मनपा प्रशासन दखल घेत नव्हते. सोमवारी नगरसेविका स्मिता घोगरे यांनी तक्रार दिली. त्यानंतर लगेच अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित टॉवर सील करण्याची कारवाई केली.कोट्यवधींचा महसूल बुडतोयशहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरमुळे महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडत आहे. महापालिका प्रशासनाने मोबाईल टॉवरच्या मुद्यावर कधीच गांभीर्याने कारवाई केली नाही. यापूर्वी कंपन्यांना नोटिसा देण्याचे काम चतुर अधिकाऱ्यांनी केले. नोटीस मिळताच काही कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. वर्षानुवर्षे ही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलAurangabadऔरंगाबाद