सिल्लोड (औरंगाबाद ) : शहरातील आरएलपार्कमधील गोडाऊन मध्ये विनापरवाना साठवून ठेवलेले तब्बल 23 लाख रुपये किमतीचे फटाके विशेष पथकाने छापा मारून पकडले. ही कार्यवाही पोलिसांनी गुरुवारी रात्री केली.
या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करुण दोन जणांना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार झाला.अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे अशी दिपक गोकुळसिंग बायस रा. जयभवानीनगर ,स्वप्निल दिलीपचंद भन्साळी रा. टिळकनगर सिल्लोड. असे असून मनोज सुभाषचंद भंन्साळी रा. टिळकनगर हा फरार झाला आहे.
अधिक माहिती अशी की, औरंगाबाद ग्रामिण यांच्या विशेष पथकाला सिल्लोड येथील आरएल पार्क मधील गोदामात विनापरवाना फटाक्यांचा साठा चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने केल्याची माहिती मिळाली. यावरून विशेष पथकाने गुरुवारी रात्री गोदामावर छापा टाकला. पथकाने २३ लाख ६० हजाराचा अवैधरीत्या साठवलेला फटाक्याचा साठा जप्त केला. तसेच पथकाने दिपक गोकुळसिंग बायस, स्वप्निल दिलीपचंद भन्साळी यांना घटनास्थळावरुन ताब्यात घेतले तर मनोज सुभाषचंद भंन्साळी हा फरार झाला.
ही कारवाई डॉ. आरती सिंह ( पोलीस अधिक्षक,औरंगाबाद, ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर वानखेडे , पोलीस नाईक योगेश खमाट , पोलीस कॉन्स्टेबल सुधीर वाघ , रोहीत पगडे यांनी केली.