शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

अस्वस्थता : भाजप, सेना, राकाँतही

By admin | Published: August 24, 2014 1:04 AM

विजय पाटील, हिंगोली आगामी विधानसभेच्या अनुषंगाने भाजपात प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पक्षाला बळ मिळण्याऐवजी डोकेदुखीच वाढण्याची शक्यता आहे.

विजय पाटील, हिंगोलीआगामी विधानसभेच्या अनुषंगाने भाजपात प्रवेशासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पक्षाला बळ मिळण्याऐवजी डोकेदुखीच वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या माजी खा.सूर्यकांता पाटील यांचाही निर्णय होत नाही. तो झाला तर काय भूमिका घ्यायची असा प्रश्न राष्ट्रवादीतील त्यांना मानणाऱ्या गटाला पडला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात कमालीची अस्वस्थता आहे.हिंगोली जिल्ह्यावर एकेकाळी शिवसेना-भाजपाचे एकहाती वर्चस्व होते. हळूहळू एकेक गड कोसळत गेला अन् आज पूर्ण जिल्ह्यावरच कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. बेरजेच्या राजकारणात कॉंग्रेस व राष्ट्रवादीने घेतलेले परिश्रम फळाला येत गेल्याचा हा परिणाम आहे. मात्र इतर निवडणुकांमध्ये अधून-मधून शिवसेना-भाजपा आपला करिष्मा दाखवतच असते. ही एकजूट पुढे टिकत नाही अन् सगळेच मुसळ केरात जाते, असा आजवरचा अनुभव आहे.सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरणनिर्मितीला प्रारंभ झाला आहे. जो-तो आपापल्या परीने दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. हिेंगोलीत कॉंग्रेसकडून आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे चौथ्यांदा विजयासाठी प्रयत्नरत आहेत. तर भाजपाकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे. पक्षातच कमी आहेत म्हणून की काय बाहेरून येणारेही थेट उमेदवारी आणणारच, अशा भीमदेवी थाटात घोषणा करीत आहेत. कॉंग्रेसचे जि.प.सदस्य मिलिंद यंबल यांनी तर भाजपाकडून मुलाखतच दिली. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील या भाजपाच्या वाटेवर असल्याची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील राष्ट्रवादीच्या गोटात हालचाली वेगवान आहेत. सूर्यकांता पाटील यांच्यामागे पाठबळ उभे करताना आपल्यालाही बळ मिळणार की कसे? याची चाचपणी करून काहीजण निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यातही काही जणांना तर आगामी विधानसभेची उमेदवारीच पाहिजे आहे. त्याच अटीवर त्यांना पुढचा निर्णय घ्यायचा आहे. माजी खा. शिवाजी माने यांची लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेशी झालेली जवळीकही काहींची अस्वस्थता वाढवत आहे. ते राष्ट्रवादीत असले तरी अचानक भगव्याखाली जातील की काय? हाही एक विषय आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत कळमनुरी व वसमत विधानसभा मतदारसंघात सगळे काही आलबेल आहे, असे नाही. भाजपात मात्र बाहेरून येणाऱ्यांमुळे अस्वस्थता आहे. मरगळलेल्या भाजपाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी कोणीही पुढे आले नव्हते. त्यावेळी आम्ही कमळाला पाणी घातले. आता मात्र बाहेरून येणारे झाडच उपटून आपल्या दारात नेण्याची भाषा करू लागल्याने निष्ठावंत नाराज आहेत. उमेदवारी कोणाला मिळेल, हे अजून निश्चित नाही. त्यामुळे या अस्वस्थेत भर पडणाऱ्या अंतर्गत घडामोडी घडत आहेत. रोज कोणीतरी पक्षश्रेष्ठींकडे जाते. काहीतरी बोलणी करते. त्याची मतदारसंघात पेरणी करते. अशा प्रकारांमुळे उमेदवारी जाहीर होईपर्यंत अस्वस्थता कायम राहणार आहे.सेनेतील अस्वस्थतेचा वसमतमध्ये उद्रेकशिवसेनेतील दोन गटांच्या राजकारणाबाबत नवे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी सर्वांचेच कान उपटले. मात्र त्यांनी दोन ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमांतच त्याला खतपाणी मिळाले, हे त्यांच्याही लक्षात आले नसावे. एवढ्या बेमालूमपणे सेनेतील मंडळी आपापल्या गटांचा जीवंतपणा सिद्ध करते, असे वैशिष्ट्य असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव ठिकाण असेल. वसमतमध्ये शनिवारी प्रकरण हातघाईवर आले. शिवसेनेचा मेळावाच उधळला गेला. कोणी कोणाला धोपटले हेही कळत नव्हते, इतकी धुमश्चक्री झाली. चक्क संपर्कप्रमुखांनीच काढता पाय घेतला.कळमनुरीत अशीही शांतताकळमनुरी विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून इच्छुक असलेल्यांची संख्या मुंबईतील मुलाखतींनंतर १९ एवढी झाली आहे. येथून उमेदवारी मिळाली म्हणजे विजय आपलाच असे वाटत असल्याने सगळे काही शांत-शांत आहे. या शांततेत काय दडले? हे कळायला मार्ग नाही.