उंडणगाव : उंडणगाव परिसर बुधवारी पहाटे धुक्यात हरविला होता. पहाटे पाच वाजेपासून एक वाजेपर्यंत अचानक आलेल्या धुक्याने परिसर झाकून गेला होता. सर्वत्र धुकेच धुके दिसत होते. दहा ते वीस फुटांपर्यंत काहीच दिसेनासे झाले. सर्वत्र पांढऱ्याशुभ्र धुक्याची झालर पसरल्याने नभ जणू जमिनीवर उतरले आहे की काय, असा भास नागरिकांना होऊ लागला.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पेरणी झाली; मात्र जोरदार पाऊस झालाच नाही. १७ जुलैपासून पाऊस गायब झाला तो तब्बल एका महिन्याने १७ ऑगस्ट रोजी आला. एका महिन्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. अतिवृष्टी, गारपीट, बेमोसमी, दुष्काळ व धुके या कालचक्रामुळे शेतकरी राजा पुरता डबघाईला आला आहे.
180821\20210818_094428.jpg
उंडणगाव परिसर धुक्यात हरविला होता. बुधवार पहाटे पासूनच जणू काही पांढरा शुभ्र शालू पांघरला होता.