शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ६० हजार जोडण्या कापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:08 AM

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत चार परिमंडळांमध्ये घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे १९ लाख २५ हजार, तर ४१५ ग्राहकांकडे तब्बल १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सातत्याने वाढत चालेल्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड या परिमंडळांतील ५९ हजार ४६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहावितरण : १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत चार परिमंडळांमध्ये घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांकडे १९ लाख २५ हजार, तर ४१५ ग्राहकांकडे तब्बल १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. सातत्याने वाढत चालेल्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. थकबाकी वसुली मोहिमेत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड या परिमंडळांतील ५९ हजार ४६२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.यासंदर्भात प्रादेशिक कार्यालयाचे म्हणणे आहे की, बहुतांश ग्राहकांची वीज बिल भरण्याची मानसिकता नाही. त्यामुळे थकबाकीची आकडेवारी सातत्याने वाढत चालली आहे. महावितरणसमोर आता वीज बिल वसुलीशिवाय दुसरा पर्याय नाही. या मोहिमेत १० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक व अन्य थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत ४४ हजार ९१९ ग्राहकांकडून ७२ कोटी १० लाख रुपये एवढी वीज बिलांची वसुली करण्यात आली आहे.प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद परिमंडळाच्या ३ लाख ९९ हजार ३३८ ग्राहकांकडे २१५ कोटी ५ लाख रुपये, जळगाव परिमंडळातील ४ लाख ८२ हजार २४५ ग्राहकांकडे १८१ कोटी २६ लाख रुपये, लातूर परिमंडळात ४ लाख ९४ हजार ८७१ ग्राहकांकडे ६३५ कोटी ६ लाख रुपये, तर नांदेड परिमंडळात ५ लाख ४८ हजार ९६१ ग्राहकांकडे ४६७ कोटी ९२ लाख रुपये, अशी एकूण १९ लाख २५ हजार ४१५ ग्राहकांकडे १ हजार ४९९ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे १५ हजार ९३८ वीज जोडण्या असून, यांच्याकडे ६९१ कोटी ३२ लाख रुपये, तर पथदिव्यांच्या २१ हजार ४८ वीज जोडण्यांकडे १ हजार ४५९ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी आहे.थकबाकी वसुलीसाठी पथके दारोदारीमहावितरणकडून राबविण्यात येणाºया शून्य थकबाकी मोहिमेंतर्गत वीज बिल वसुली मोहीम सुरू करण्यात आली असून, या मोहिमेत अभियंते व कर्मचाºयांची पथके दारोदारी जाऊन थकबाकीची वसुली करीत आहेत. जे थकबाकीदार ग्राहक प्रतिसाद देत नाहीत, अशा ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणच्या शाखा व उपविभागीय कार्यालयात वीज बिलांच्या दुरुस्तीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. ज्या ग्राहकांच्या वीज बिलांसंदर्भात तक्रारी असतील, अशा ग्राहकांनी जवळच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक कार्यालयाने केले आहे.