शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसा संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
2
LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
3
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?
4
विराट पुन्हा होणार RCBचा कर्णधार, बंगळुरूचा संघ 'या' ६ खेळाडूंना रिटेन करणार असल्याची चर्चा
5
"सलमान खान लॉरेंस बिश्नोईपेक्षाही वाईट!", सोमी अली म्हणाली - त्याने ऐश्वर्याचे हाड मोडले होते...
6
मुंबईत उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना ‘काँटे की टक्कर’, ११ मतदारसंघांमध्ये थेट सामना, उमेदवारांचा कस लागणार
7
काव्या मारन यांची तगडी शॉपिंग! सलामीवीरांना दुप्पट पगार वाढ; क्लासेनला दिलं २३ कोटींचं पॅकेज
8
Stock Market Updates: दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Cipla मध्ये मोठी तेजी
9
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
10
Muhurat Trading: दिवाळीत होतं मुहूर्त ट्रेडिंग, शेअर बाजारासाठी खास आहे त्याचा इतिहास; जाणून घ्या
11
शिंदे - अजित पवारांना संपविण्याची भाजपची खेळी, मविआमध्ये वाद नाहीत - रमेश चेन्नीथला 
12
Google Pay, PhonePe आणि Paytm युझर्स लक्ष द्या, १ नोव्हेंबरपासून UPI पेमेंटमध्ये होणार २ बदल
13
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
14
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
15
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
16
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
17
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
18
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
19
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
20
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 

शिक्षकाच्या निगराणीला वानरसेना, शाळेवर भरलेल्या वर्गाची चर्चा रंगली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 8:28 PM

खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर बसलेले वानर शिक्षकांवर नजर ठेवून तर नाही ना अशीच चर्चा सोशलमिडीयावर होत आहे.

- सुनील घोडकेखुलताबाद (औरंगाबाद) : गंगापूर- खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रशांत बंब यांनी मांडलेला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मुख्यालयी राहावे हा विषय सध्या राज्यभरात गाजत आहे. त्यातच तालुक्यातील गदाना जिल्हा परिषदेच्या शाळेवर वानरसेनेच्या भरलेल्या वर्ग कुतूहलाचा विषय ठरत आहे. दरम्यान, शिक्षकांच्या निगराणीला वानरसेना, असे कॅप्शन देऊन हा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. 

खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर मोठ्या प्रमाणावर वानर बसलेले होते. हा फोटो काही वेळातच सोशल मिडीयावर व्हायरल झाला. दरम्यान, शिक्षकांच्या निगराणीला वानरसेना, सीसीटीव्ही कॅमेरा असे कॅप्शन देऊन हा फोटो शिक्षक आणि गावकऱ्यांच्या ग्रुपमध्ये फिरत आहे. 

गंगापूर- खुलताबादचे आ. प्रशांत बंब यांनी शिक्षकांना मुख्यालयी राहावेच लागेल जे राहत नाहीत, अशा शिक्षकांचे वेतन बंद करण्यात यावे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहे. याच पार्श्वभूमीवर हा फोटो शिक्षकांच्या समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर फिरत असून शिक्षकांवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर (सीसीटीव्ही कॅमेरा)  म्हणून उल्लेख केला आहे. त्यामुळे मोठी चर्चा होत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादzp schoolजिल्हा परिषद शाळा