शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

पतीचे भावजयीसोबत अनैतिक संबंध

By admin | Published: June 24, 2017 12:19 AM

बीड : दोन मुलांना जाळून मारणाऱ्या आपल्या पतीचे भावजयीसोबतच अनैतिक संबंध होते, अशी फिर्याद निर्दयी पित्याने जाळून मारलेल्या मुलांच्या आईने दिंद्रूड पोलीस ठाण्यात दिली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दोन मुलांना जाळून मारणाऱ्या आपल्या पतीचे भावजयीसोबतच अनैतिक संबंध होते, अशी फिर्याद निर्दयी पित्याने जाळून मारलेल्या मुलांच्या आईने दिंद्रूड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथे कुंदन वानखेडे या पित्याने आपल्या पोटच्या बलभीम आणि वैष्णव या दोन मुलांना जाळून मारले होते. त्यानंतर तो फरार झाला. रात्री मुलांची आई रेखा वानखेडे यांच्या फिर्यादीवरून दिंद्रूड पोलीस ठाण्यात पती कुंदन सुधाकर वानखेडे, सासरे सुधाकर वानखेडे, सासू विमल सुधाकर वानखेडे, दीर सचिन सुधाकर वानखेडे, भावजय अनिता सचिन वानखेडे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, लग्नानंतर पती कुंदनचे भावजय अनितासोबत अनैतिक संबंध होते. वारंवार त्यांना सांगितले. परंतु त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे रेखा व कुंदन यांच्यात रोज वाद व्हायचे. या रोजच्या वादाला कंटाळून रेखा माहेरी निघून गेली. त्यानंतर तिने न्यायालयात दावा टाकून मुलांची मागणी केली. याचा निकाल शुक्रवारी लागणार होता. पत्नी तर सोडून गेलीच आता मुलेही जाणार या विरहातून कुंदनने मुलांना मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अनिता व कुंदन यांच्यात काय संबंध होते, हे तपासानंतर समोर येईलच, असे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आर.एस.सानप यांनी सांगितले.आरोपी फरारकुंदन अगोदरच फरार होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच इतर आरोपींनीही धृूम ठोकली. ते अद्यापही फरारच असून त्यांच्या शोधासाठी दोन पथके नेमल्याचे सहायक पोलीस निरीक्षक आर.एस.सानप यांनी सांगितले.