शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
2
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
3
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
4
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
5
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
6
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
7
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
8
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
9
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
10
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
11
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
12
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
13
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
14
Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?
15
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
16
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
17
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
18
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
19
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
20
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शहरात; उद्याच्या सभेच्या पार्श्वभूमी 'या' मार्गावर वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 12:03 PM

अमित शहा यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल, ५ मार्च रोजी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत सभास्थळाकडील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ४ मार्च सोमवार रोजी रात्री १०.१० मिनिटांनी शहरात येत आहेत. दरम्यान, शाह यांच्या सांस्कृतिक क्रीडा मंडळावरील सभेसाठी मंगळवारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.

सोमवारी रात्री विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते जालना रोडवरील रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये मुक्कामी थांबतील. मंगळवार ५ रोजी सकाळी सव्वा दहा वाजता विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अकोल्याकडे रवाना होतील. अकोल्यात चार लोकसभा सर्किटची बैठक त्यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर ते जळगावकडे जातील. तेथील नियोजित कार्यक्रम आटोपून सायं. ५ वा. ४० मिनिटांनी ते छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे हेलिकॉप्टरने येतील. 

सायं. ६ वा. १० मिनिटांनी ते वाहनाने क्रांतीचौक कडे प्रयाण करतील. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. तेथून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानाकडे रवाना होतील. सायं. ६ वा. ३५ मिनिटांनी जाहीर सभेस उपस्थित राहून संबोधन करतील. सायंकाळी साडेसात वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरुन मोटारीने विमानतळाकडे जातील. तेथून ७.३४ वा. विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

अमित शहा यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल५ मार्च रोजी दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत खालील मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. ही माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांनी दिली. त्यात जुनी मल्टीपर्पज शाळा ते नारळीबाग चौक, आयटीआय ते खडकेश्वर टी पॉइंट, जुबिली पार्क ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे जाणारा रस्ता, गीता झेरॉक्स ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाकडे जाणारा रस्ता, मिल कॉर्नर ते खडकेश्वरमार्गे महात्मा फुले चौकाकडे जाणारा रस्ता बंद असणार आहे. त्यास मिल कॉर्नर ते भडकल गेट आणि मिल कॉर्नर ते वरद गणेश मंदिरमार्गे सावरकर चौक असा पर्यायी रस्ता असणार आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभाAmit Shahअमित शाहBJPभाजपा