विकास राऊत, औरंगाबादकेंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालय तथा ग्रामविकासमंत्री बिरेंद्रसिंह चौधरी यांच्या विभागाने बाटलीबंद पाणी बैठक, पत्र परिषद, कार्यशाळेत वापरण्यात येऊ नये, असा आदेश काढलेला असताना चौधरी यांच्या उपस्थितीत विकासपर्व संवाद कार्यक्रमाच्या पत्रपरिषदेत सर्रासपणे बाटलीबंद पाण्याचा वापर करण्यात आला. स्वत:च्या विभागाने काढलेल्या अध्यादेशाला त्यांच्याच उपस्थितीत छेद देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत मिशन राष्ट्रीय स्तरावर घेऊन प्रसार करीत आहेत. त्यासाठी मोठ-मोठे निर्णय ते घेत आहे. स्वच्छ भारत मिशन घेऊन मोदी वाटचाल करीत असताना मोदींच्या स्वच्छ भारत मिशनला ग्रामविकासमंत्र्यांच्या उपस्थितीतच हरताळ फासला गेला आहे. २ आॅक्टोबर २०१९ साली महात्मा गांधी यांची १५० जयंती आहे. हे मिशन आणि प्रशासनाची भूमिका म्हणून मंत्रालयस्तरावरून बाटलीबंद पाण्याचा वापर करण्यात येऊ नये असे आदेश पारित करण्यात आले. काही राज्यांनी याची सुरुवातदेखील केली आहे. यापुढे मंत्र्यांच्या व शासकीय बैठकांमध्ये बाटलीबंद पाणी वापरण्याऐवजी शुद्ध पेयजलाची वेगळी व्यवस्था करावी. जेणेकरून प्लास्टिक कचऱ्याच्या निर्मितीला आळा बसेल, अशा (पान ५ वर)
स्वच्छ भारत मिशनला केंद्रीयमंत्र्यांचा छेद
By admin | Published: June 07, 2016 11:39 PM