महागाईचा अनोखा निषेध; स्मृती इराणींना चोळी-बांगडी, तर पंतप्रधान मोदींना टॉवेल-टोपीचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 05:22 PM2021-03-18T17:22:26+5:302021-03-18T17:39:53+5:30

मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या काळात पेट्रोल, गॅस, अन्नधान्य, खाद्यतेल यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत.

Unique protest against inflation; Smriti Irani wears a choli-bangle, while Prime Minister Modi wears a towel-hat | महागाईचा अनोखा निषेध; स्मृती इराणींना चोळी-बांगडी, तर पंतप्रधान मोदींना टॉवेल-टोपीचा आहेर

महागाईचा अनोखा निषेध; स्मृती इराणींना चोळी-बांगडी, तर पंतप्रधान मोदींना टॉवेल-टोपीचा आहेर

googlenewsNext
ठळक मुद्देमहागाई वाढल्याने भाजप सरकारला रिटर्न गिफ्ट. दोन्ही नेत्यांना हा आहेर पोस्टाने पाठविण्यात आला

औरंगाबाद : भाजप सरकारचा निषेध आणि महागाईचा विरोध म्हणून युवक काँग्रेसतर्फे स्मृती इराणी यांना चोळी बांगडीचा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॉवेल टोपीचा आहेर करण्यात आला. दोन्ही नेत्यांना हा आहेर पोस्टाने पाठविण्यात आला आहे. 

मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या काळात पेट्रोल, गॅस, अन्नधान्य, खाद्यतेल यांच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. तरीही स्मृती इराणी व इतर भाजप नेते याविषयी मौन धरून आहेत. याउलट २०१२- १३ यावर्षी तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात महागाईच्या मुद्द्यावर स्मृती इराणी व इतर भाजप नेत्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठविल्या होत्या. म्हणून आता भाजप सरकारचा निषेध म्हणून युवक काँग्रेसतर्फे स्मृती इराणी यांना चोळी बांगडी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॉवेल टोपी 'रिटर्न गिफ्ट' स्वरूपात देऊन आहेर करण्यात आला.

दोन्ही नेत्यांना हा आहेर पोस्टाने पाठविण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते डॉ. निलेश अंबेवाडीकर, गुरमित सिंग गिल, विजय कांबळे, आकाश रगडे, मयूर साठे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Unique protest against inflation; Smriti Irani wears a choli-bangle, while Prime Minister Modi wears a towel-hat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.