औरंगाबाद -विविध महाविद्यालयीन तदर्थ प्राध्यापक कार्यरत आहेत. त्या ३०७ प्राध्यापकांकडे कायमस्वरूपी मान्यता पत्र नसल्याचे दर्शवून सर्व अर्ज रद्द करण्यात आले. त्यांना सामावून घ्या. नोंदणी करूनही त्यांची प्राथमिक मतदार यादीत नाव नाही त्यांना मतदार होण्याची संधी द्या आदी मागण्यांसंदर्भात विद्यापीठ विकास मंचाच्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ प्रमोद येवले, निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना निवेदन दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यापीठाच्या निवडणुकीत विविध प्राधिकरणात जसे प्राध्यापक, प्राचार्य, पदवीधर, संस्थाचालक आणि विभाग प्रमुखांच्या प्राथमिक मतदार याद्या सोमवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या. या यादीत ३०७ तदर्थ अध्यापकांना जे यापुर्वी मतदार, विविध प्राधिकरणावर प्रतिनिधित्वही केले होते. त्यांना मतदान वगळण्यात आले. तसेच ६० ते ७० प्राध्यापकांनी आपली नाव नोंदणी करूनही हार्ड कॉपी सर्व कागदपत्रासह सादर करण्यात आलेली आहे. तरीही त्यांचे नाव कोणत्याही पात्र, अपात्र, रद्द यादीमध्ये आढळून आलेले नाही. तसेच महिलांच्या आडनावा संदर्भातील त्रुटींवरून रद्द करण्यात आलेल्या प्रश्नांवर कुलगुरूंशी चर्चा करून प्राथमिक मतदार यादीतील घोळ लक्षात आणून दिले. तसेच विना अनुदानीत संस्थाचालक हातमिळवणी करून पात्र न नसतांना नोंदणी केली. त्याची चौकशी करून खोटी कागदपत्रे देणाऱ्यांवर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी विद्यापीठ विकास मंचचे डाॅ. गजानन सानप यांनी केली.
कुलगुरूंकडून सकारात्क प्रतिसादतदर्थ प्राध्यापकांनी आक्षेप अर्ज, विद्यापीठाचे मान्यता पत्र विद्यापीठात ३० सप्टेंबर पर्यंत सादर करावेत. महिलांच्या आडनाव बदला संदर्भातही पुराव्यासह आक्षेप नोंदवावे. नोंदणी करून अर्ज सादरही केलेल्या पोच पावती व सर्व कागदपत्रे जोडून आक्षेप सादर करा त्यांना न्याय देवू असे आश्वासन कुलगुरूंनी दिल्याचे डॉ. गोविंद काळे काळे यांनी सांगितले.
आक्षेप त्रुटीपुर्ततेचे शेवटचे दोन दिवसप्राथमिक मतदार यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी शुक्रवार पर्यंत मुदत आहे. शेवटचे दोन दिवस उरलेले असून दररोज येणाऱ्या आक्षेपांचा आढावा कुलसचिवांसह निवडणूक समितीचे अध्यक्ष डाॅ. सुरेश गायकवाड आदीसह निवडणूक विभाग घेत आहे. आतापर्यंत आलेल्या आक्षेप आणि त्रुटीपुर्ततांची संख्या शंभरच्या जवळपास असून त्याची पुढे कुलसचिव डाॅ. जयश्री सुर्यवंशी सुनावणी घेतील असे डाॅ. गायकवाड म्हणाले.
यावेळी विद्यापीठ विकास मंचचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. गजानन सानप, डॉ. गोविंद काळे, डॉ.भगवानसिंग यांच्यासह डॉ. कालिदास भांगे डॉ सचिन कंदले, डॉ. विक्रम दहिफळे डॉ. सर्जेराव जीगे,डॉ. स्वामीनाथ खाडे डॉ. अशोक कोरडे डॉ. उमेश मुंडे डॉ.नवनाथ आघाव डॉ. भाऊसाहेब सोनटक्के डॉ. सुरेश कांगणे डॉ. हरी जमाले डॉ. नागरे डी.पी. डॉ. प्रवीण कोकणे डॉ. माधव हेबाडे डॉ. नवनाथ शिंदे डॉ. गजानन मुधोळकर डॉ. सचिन तांदळे डॉ. दया पाटील यांच्यासह विद्यापीठ विकास मंचचे प्राध्यापक कार्यकर्ते उपस्थित होते.