औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालाचीन वकिलातीच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि.१) भेट दिली. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. चीनमधील शेन झेन विद्यापीठाशी २२ डिसेंबर रोजी सामंजस्य करार केला जाणार आहे. यात विविध शैक्षणिक बाबींची देवाणघेवाण केली जाणार असल्याची माहिती डॉ. तेजनकर यांनी दिली.औरंगाबाद आणि चीनमधील ड्यून हाँग ही दोन शहरे सिस्टर सिटी म्हणून एकत्रितपणे कार्य करीत आहेत. यानिमित्ताने चीनच्या भारतीय वकिलातीमधील १० जणांचे शिष्टमंडळ औरंगाबाद दौऱ्यावर आले आहे. या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांची भेट घेतली. चीनमधील शेन झेन विद्यापीठ पदवी, माहिती तंत्रज्ञानाची देवणघेवाण, प्राध्यापक, विद्यार्थ्यांचे आदानप्रदान, शैक्षणिक कार्यक्रम आणि एकत्रित संशोधन करण्यासंदर्भात सामंजस्य करार करणार आहे. याविषयीची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली आहे. २२ डिसेंबर रोजी दोन्ही विद्यापीठांचे १५ तज्ज्ञ आणि दोन्ही देशांचे मंत्री यांच्या उपस्थितीत चार तासांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम विद्यापीठात होणार आहे. त्यात विविध विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचेही डॉ. तेजनकर यांनी स्पष्ट केले.इतिहास, पुरातत्व विभागांशी स्वतंत्र करारशेन झेन विद्यापीठाशी शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात येत असतानाच चीनमधील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणाºया ड्यून हाँग अकॅडेमी या संस्थेशी विद्यापीठातील इतिहास, भूगोल आणि पुरातत्व विभाग एक स्वतंत्र करार करणार आहे. यात ऐतिहासिक वास्तू संवर्धनासंदर्भातील कार्यक्रम राहणार आहे. यातून औरंगाबाद परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास, संशोधन करून एकत्रितपणे संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. तेजनकर यांनी सांगितले.फोटो ओळ : विद्यापीठात आलेल्या चीनच्या शिष्टमंडळाशी संवाद साधताना प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर. यावेळी विभागप्रमुख डॉ. राजेश रगडे, डॉ. प्रवीण वक्ते यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. शंकर अंभोरे आदी उपस्थित होते.
चीनमधील विद्यापीठाशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 11:48 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला चीन वकिलातीच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि.१) भेट दिली. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. चीनमधील शेन झेन विद्यापीठाशी २२ डिसेंबर रोजी सामंजस्य करार केला जाणार आहे.
ठळक मुद्देशैक्षणिक व सांस्कृतिक देवाण घेवाण : २२ डिसेंबर रोजी संयुक्त चर्चासत्राचे आयोजन