शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

कौशल्य विद्यापीठाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:26 AM

शेती आणि शेतीवर आधारित ग्रामीण भागातील उद्योग वाढीसाठी मराठवाड्यात कौशल्य विद्यापीठाची शासनाकडे मागणी केली आहे. याद्वारे दहा लाख युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, कृषी संवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम यासह शेतीबरोबर निगडित उद्योग वाढीवर भर दिला जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर रविवारी ‘रुरल चेंबर आॅफ कॉमर्स’च्या उद््घाटनप्रसंगी म्हणाले.

ठळक मुद्देपुरुषोत्तम भापकर : ‘रुरल चेंबर आॅफ कॉमर्स’चे उद््घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेती आणि शेतीवर आधारित ग्रामीण भागातील उद्योग वाढीसाठी मराठवाड्यात कौशल्य विद्यापीठाची शासनाकडे मागणी केली आहे. याद्वारे दहा लाख युवक-युवतींना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण, कृषी संवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम यासह शेतीबरोबर निगडित उद्योग वाढीवर भर दिला जाईल, असे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर रविवारी ‘रुरल चेंबर आॅफ कॉमर्स’च्या उद््घाटनप्रसंगी म्हणाले.ग्रामीण भागात नवीन उद्योग उभारले जावेत, नवीन उद्योजक निर्माण करणे, यादृष्टीने माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी रुरल चेंबर आॅफ कॉमर्सची स्थापना करण्यात आली आहे. एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात आयोजित कार्यक्रमात डॉ. भापकर यांच्या हस्ते उद््घाटन झाले. एमआयटीचे अध्यक्ष यज्ञदेव कवडे अध्यक्षस्थानी होते. अखिल भारतीय हरिजन सेवक संघाचे डॉ. शंकरकुमार सन्याल, माजी खासदार नरेश यादव, रुरल चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अतुल घुईखेडकर, उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, उद्योजक अखिलेश कटियार, राम जोगदंड, शिवाजी झोंबाडे, डॉ. अभय पाटील, राजेंद्र गावित, डॉ. विजय माने यांची उपस्थिती होती.डॉ.भापकर म्हणाले, ज्ञानाबरोबर कौशल्य आणि तंत्रज्ञान असणे गरजेचे आहे. ज्याच्याकडे या तिन्ही गोष्टी नाहीत, तो मागे पडतो. त्यामुळे या तिन्ही गोष्टी देण्याची आज गरज आहे. नॉलेज, कॉलेज आणि व्हिलेज हा एक उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना शेतीचे ज्ञान, विविध योजना, स्वयंरोजगाराच्या योजना आदींविषयी मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण उद्योग वाढीसाठी उत्पादन, मार्केटिंग आणि प्रक्रिया या गोष्टींना बळ दिले पाहिजे. शासनाकडे मराठवाड्यासाठी १ हजार गटशेतीचे उद्दिष्ट देण्याची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. सन्याल म्हणाले, खेडी पुढे गेली पाहिजे, असे महात्मा गांधी म्हणत होते. परंतु खेड्यातून लोक शहरात येतात. त्यामुळे गांधीजींचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी आता कुठेतरी पाऊल पडत आहे.ब्रँड, मार्केटिंग, समन्वयाचा अभावडॉ. विजय माने म्हणाले, ग्रामीण भागातील उद्योगांना उत्पादनापेक्षा ब्रॅडिंगवर अधिक खर्च करावा लागतो. तो अनेकांना शक्य होत नाही. ब्रँडसह मार्केटिंग, समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टींवर मात करून ग्रामीण भागात समृद्धी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.बेरोजगारवाद धोकादायकदरवर्षी हजारो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. परंतु नोकरी मिळत नाही. दहशतवाद, नक्षलवादापेक्षा बेरोजगारवाद हा अधिक धोकादायक आहे. ग्रामीण भागात एमआयडीसीचे उद्योग नाहीत. ग्रामीण भागात उद्योग वाढीसाठी युवकांची मानसिकता बदलली पाहिजे, असे अतुल घुईखेडकर म्हणाले.

टॅग्स :Divisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयAurangabadऔरंगाबाद