औरंगाबाद : मुंबई येथे १३ ते १८ फेब्रुवारीदरम्यान २२ व्या क्रीडा महोत्सव आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अॅथलेटिक्स, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉलचे संघ रवाना झाले आहे. या संघांचे प्रशिक्षण शिबीर ८ ते १२ फेब्रुवारीदरम्यान झाले. अॅथलेटिक्ससाठी प्रशिक्षक म्हणून सुरेंद्र मोदी, नितीन निरावणे, तर व्यवस्थापक म्हणून डॉ. रंजन बडवणे व पूनम राठोड असणार आहेत. बास्केटबॉलसाठी संदीप ढंगारे, सय्यद जमीर हे प्रशिक्षक त व्यवस्थापक म्हणून अजय बढे, कृष्णा पारभाने असणार आहेत. कबड्डी संघांच्या प्रशिक्षकपदी भागचंद सानप व साजेद चौस, तर व्यवस्थापक म्हणून नेताजी मुळे व राजेश क्षीरसागर भूमिका बजावणार आहेत. खो-खो संघाचे प्रशिक्षकपद युसूफ पठाण व गंगाधर मोदाळे यांच्यावर असणार आहे. व्यवस्थापक म्हणून उदय पंड्या व कपिल सोनटक्के असणार आहेत. व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षकपद अभिजित दिख्खत व रणधीर कदम भूषवणार आहेत. व्यवस्थापक म्हणून महेशराजे निंबाळकर व प्रवीण शिलेदार असणार आहेत. या संघाला कुलगुरूप्रो. बी. ए. चोपडे, प्र कुलगुरू प्रोफेसर अशोक तेजनकर, कुलसचिव साधना पांडे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, मसूद हामी, किरण शूरकांबळे, रामेश्वर विधाते, रंगनाथ अहिरे, मोहन वाहीलवार, विक्रमसिंह चौहान आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
विद्यापीठाचा संघ रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 1:11 AM