शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

विद्यापीठाला ‘रुसा’चे १२० कोटी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 12:59 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात १२० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. तसेच ‘रुसा’तील एका खरेदीमध्ये गडबड झाल्याचे लक्षात येताच ६० लाख रुपयांचे बिल थांबविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात १२० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. तसेच ‘रुसा’तील एका खरेदीमध्ये गडबड झाल्याचे लक्षात येताच ६० लाख रुपयांचे बिल थांबविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारने उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानची स्थापना केली आहे. या अभियानांतर्गत देशभरातील विद्यापीठांना निधी देण्यात येत आहे. यात केंद्र सरकार ६०, तर राज्य सरकार ४० टक्के निधी देतात. यासाठी विद्यापीठाला निधीचा प्रस्ताव दाखल करावा लागतो. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठाला ‘रुसा’ने १२० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून विद्यापीठ आणि महाविद्यालयातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याचेही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. विद्यापीठातील २०० प्राध्यापकांपैकी केवळ ४७ जणांनीच ‘रुसा’ अंतर्गत संशोधनासाठी प्रस्ताव पाठविले. सर्वच प्राध्यापकांनी यात सहभागी होणे आवश्यक होते. मात्र आपल्याकडे स्वत: मिळविण्याऐवजी दुसºयाने मिळविल्यानंतर त्याकडे बोट दाखविणारे अधिक आहेत. आता हौशे, गवसे, नवसे लोक चालणार नाहीत. हिंदी विभागातील प्राध्यापकांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी स्वत: खास प्रयत्न केले. विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रकल्पांना निधी मिळतो. मात्र सामाजिक शास्त्रातील विषयात या तुलनेत मागे पडतात. यामुळे सामाजिक शास्त्रातील विषयांना अधिक निधी मिळावा म्हणूनही विशेष प्रयत्न केल्याचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे म्हणाले.आॅर्डर एकाची, घेतली दुसºयानेचविद्यापीठात ‘रुसा’अंतर्गत काही गोष्टींची खरेदी केली होती. यात आॅर्डर एकाने केली. मात्र उपकरणे दुसºयानेच घेतल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे या खरेदीत अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. यामुळे तब्बल ६० लाख रुपयांचे बिल थांबविले आहे. या प्रकरणात अंतर्गत पातळीवर वित्त व लेखाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती चौकशी करीत असल्याचेही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी स्पष्ट केले.नवीन वर्षामध्ये विद्यापीठासमोर सर्वात महत्त्वाचे आव्हान हे ‘नॅक’चे आहे. विद्यापीठ-२०१८ मधील सप्टेंबरमध्ये ‘नॅक’च्या थर्ड सायकलला सामोरे जाणार आहे. ही कठीण परीक्षा असेल. त्यात उत्तीर्ण होणे हेच मुख्य उद्दिष्ट नवीन वर्षात असेल.- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू