शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
5
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
6
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
7
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
8
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
9
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
10
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
11
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
12
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
13
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
14
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
15
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
16
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
17
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
18
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
19
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
20
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...

विद्यापीठाची आजपासून ५ वर्षांतील सर्वांत मोठी परीक्षा; मूल्यांकनासाठी नॅकची ‘पीअर टीम’ दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 11:47 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या नॅक मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी मिळविली होती.

छत्रपती संभाजीनगर : पाच वर्षांनंतर संपूर्ण विद्यापीठाचे मूल्यांकन करणारी बंगळुरू येथील ‘पीअर टीम’ दाखल झाली आहे. आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून गुरुवारपर्यंत विविध विभागांना भेट देणार आहेत. तत्पूर्वी विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी विभागप्रमुखांची बैठक घेत तयारीची उजळणी केली. विद्यापीठाची महत्त्वाच्या २१ विभागांसह विस्तार सेवांवर भिस्त असल्याचे सांगण्यात येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी झालेल्या नॅक मूल्यांकनात ‘अ’ श्रेणी मिळविली होती. आता पुन्हा नॅक मूल्यांकनासाठी विद्यापीठ प्रशासनाने तयारी केली. विद्यापीठाचा स्वयंमूल्यमापन अहवाल (एसएसआर) मे महिन्यात अंतिम करून तो राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडे पाठविला होता. त्यानंतर ‘नॅक पीअर टीम’ विद्यापीठात दाखल होत आहे. मंगळवार ते गुरुवारपर्यंत सातजणांची टीम विविध विभागांना भेट देत स्वयंमूल्यमापन अहवालानुसार तपासणी करणार आहे.

या सात निकषांवर भरनॅक मूल्यांकनात सात निकषांवर भर देण्यात येतो. यामध्ये अभ्यासक्रमाचे पैलू, अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन, संशोधन, नवकल्पना आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिकण्याची संसाधने, विद्यार्थ्यांची प्रगती, शासन, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्ये आणि सर्वोत्तम पद्धती, आदींचा समावेश आहे. ‘नॅक’च्या निकषांचा विचार करीत विद्यापीठाने काही विभागांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे सांगण्यात येते. ज्यामध्ये २१ विभागांचा समावेश आहे. यासह कमवा व शिका योजना, ग्रंथालय अशा विस्तार सेवांवरही भर असणार आहे.

मूल्यांकन समितीमध्ये सातजणांचा समावेशमूल्यांकनासाठी प्रा. ए. एन. राय यांच्या अध्यक्षतेखालील ‘पिअर टिम’मध्ये प्रा. विमला एम या सदस्य समन्वयक आहेत. तसेच प्रा. विशाल गोयल, प्रा. रोव्हरू नागराज, प्रा. ग्यानेंद्र कुमार राऊत, प्रा. साबियासी सारखेल व प्रा. के. एस. चंद्रशेखर यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान समिती विभागांना भेट देणार आहे. ही समिती सकाळी ९ ते सायंकाळी नियोजित काम संपेपर्यंत पाहणी करेल. तसेच विद्यार्थी, संशोधक, माजी विद्यार्थी, पालक, विभागप्रमुख, अधिष्ठाता, कर्मचारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, आदींशी संवाद साधणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर