सिल्लोड: के-हाळा जवळील पूर्णा नदीतून अवैद्य वाळू वाहतूक करणारे एक टिप्पर व जेसेबी सिल्लोड महसूल विभागाने गुरुवारी रात्री पकडले. दोन्ही वाहनांच्या चालकांना ताब्यात घेऊन 10 लाख रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी दिली.
अंकुश रामराव पवार रा.जवखेडा यांच्या मालकीचे टिप्पर क्रमांक एमएच 21 बीएच 5094 , व देविदास पांडुरंग मगर रा.निल्लोड यांचे जेसीबी क्रमांक एमएच 23, एजे 1490 जप्त करण्यात आले आहे. संबंधित आरोपी विरुद्ध 10 लाख 10 हजार 800 रुपये दंडात्मक कार्यवाही तहसीलदार यांनी प्रस्तावित केली आहे.
ही कारवाई उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शन खाली मंडळ अधिकारी राजू ससाणे, के-हाळा येथील तलाठी विजय चव्हाण,बोरगाव कासारी तलाठी विजय राठोड,पळशी तलाठी गजेंद्र चांदे,कायगाव तलाठी महेंद्र वारकड, लिपिक एन.के. घुगे,पोलीस पाटील संजय दारूनटे, कोतवाल राजेश बसैये, पोलीस कर्मचारी कैलास द्वारकुंडे,विकास नायसे यांनी केली.