औरंगाबाद : बाजारपेठ अनलॉक होताच शहरात वैद्यकीय पर्यटन पुन्हा वाढू लागले आहेत. सध्या विदेशातील रुग्णांना परवानगी नसल्याने तरी राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक या महानगरातील युवक-युवती विशेषत: कॉस्मेटिक सर्जरीसाठी औरंगाबादेत येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहिफळे हॉस्पिटलमध्ये सॅनिटायझर लावणे, थर्मल गन, ऑक्सिमीटरद्वारे तपासणी, फिजिकल डिस्टन्सिंग अशी संपूर्ण खबरदारी घेऊन रुग्णांवर कॉस्मेटिक सर्जरी केली जात आहे.
काय् तुमच्या चेहऱ्यावर व्यंग आहे, त्यामुळे लग्न जपण्यास विलंब लागत आहे. तुमच्या व्यंगामुळे स्थळांकडून नकार मिळत आहे. या समस्येने तुम्ही चिंतातुर आहात. अशा लग्नइच्छुक तरुण-तरुणींसाठी’ दहिफळे हॉस्पिटल’ वरदान ठरत आहे. कारण, आजपर्यंत या हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक सर्जरी केलेले शेकडो युवक-युवतींचे लग्न जमले व आज ते आपला संसार आनंदात करीत आहेत. चेहऱ्यावरील व्यंग काढून नव सौंदर्येनिर्माण करून देणाऱ्या ॲस्थॅटिक, लेसर आणि प्लास्टिक सर्जन डॉ. उज्ज्वला दहिफळे यांचे नाव देशातच नव्हे जगभरात पसरले आहे.
डॉ. दहिफळे यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांचा चेहऱ्यावरील व्यंग दूर होतेच शिवाय त्यांचा आत्मविश्वास आणखी दृढ होतो. कोरोनाआधी अरब देशातून असंख्य रुग्ण खास कॉस्मॅटिक सर्जरी, प्लास्टीक सर्जरी, लेसर उपचार करण्यासाठी खास औरंगाबादेत येत होते. अजूनही डाॅ. दहिफळे यांना विदेशातून रुग्णांचे फोन येत असतात. भारत कधी सर्व नॉर्मल होईल व आम्हाला औरंगाबादेत येऊन उपचार करण्यास मिळेल, अशी विचारणा केली जात आहे.
चौकट
औरंगाबादेतच का करतात कॉस्मॅटिक सर्जरी
मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या भागांतील तरुणाई कॉस्मॅटिक सर्जरीसाठी औरंगाबादेत येत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मुंबई, पुणे येथे शेकडो प्लास्टीक सर्जन डॉक्टर असताना तेथील रुग्ण औरंगाबादेत का येतात. त्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण, म्हणजे कॉस्मॅटिक, प्लास्टिक सर्जरी असो वा लेसर उपचार महानगरापेक्षा येथील खर्चात तब्बल २५ ते ३० टक्के फरक पडतो. अन्य महानगरांपेक्षा येथे उपचार खर्च कमी आहे. दुसरे महत्त्वाचे कारण, म्हणजे अचूकपद्धतीने केली जाणारी सर्जरी होय. अद्ययावत वैैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर व उच्चतम गुणवत्ता व तिसरे कारण म्हणजे चेहऱ्यावरील व्यंग नष्ट होऊन नवसौंदर्य प्राप्त झाल्याने आनंदित, समाधानी झालेले रुग्ण याचा प्रचार-प्रसार करतात व त्यातून होणारी प्रसिद्धी रुग्णांना औरंगाबादेत खेचून आणते.
( डॉ. दहिफळे एलएमएससाठी पहिला भाग)