शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

विनापरवाना पाणी विक्री

By admin | Published: July 24, 2016 12:17 AM

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात ज्यूस विक्रीचा परवाना असताना बिनधास्त विनापरवाना पाण्याच्या बॉटल्स विक्री करणाऱ्या स्टॉलधारकाच्या ‘दबंगगिरी’ला

औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकात ज्यूस विक्रीचा परवाना असताना बिनधास्त विनापरवाना पाण्याच्या बॉटल्स विक्री करणाऱ्या स्टॉलधारकाच्या ‘दबंगगिरी’ला शनिवारी ‘एसटी’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागले. जप्तीची कारवाई करताना स्टॉलधारकासमोर कर्मचाऱ्यांना चक्क नमते घ्यावे लागले. त्यामुळे पाण्याच्या बॉटल्सचे अनेक बॉक्स असताना अवघे दोन बॉक्स जप्त करून त्यांना माघारी परतावे लागले.मध्यवर्ती बसस्थानकात जवळपास ३० हॉकर्स आणि कॅन्टीन तसेच स्टॉलचे ६ (आस्थापना) परवानाधारक व्यवसाय करतात. कॅन्टीन तसेच अन्य स्टॉल्सचे प्रत्येकी तिघेजण बसस्थानकात फिरून पाण्याच्या बॉटल्स किंवा अन्य खाद्यपदार्थ विक्री करतात. नियमानुसार या आस्थापनांना तीन हॉकर्सची परवानगी आहे; परंतु प्रत्यक्षात अधिक हॉकर्स व्यवसाय करतात. त्यातही भर म्हणजे काही जणांच्या परवान्यावर दुसरेच फेरीवाले व्यवसाय करीत आहे.तसेच परवाना देताना त्यावर खाद्यपदार्थांची नावे नमूद असतात. परंतु त्याव्यतिरिक्तही खाद्यपदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे. बसस्थानकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शनिवारी अशांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. स्वच्छतागृहाच्या शेजारी असलेल्या ज्यूसच्या स्टॉलवर विनापरवाना पाण्याच्या बॉटल्सची विक्री होत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे येथील पाण्याच्या बॉटल्स जप्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली.