छत्रपती संभाजीनगर : मागील महिन्यात पडलेला अवकाळी पाऊस व आता उष्णतेची लाट याचा फटका भाज्यांना बसला आहे. लवकर भाज्या खराब होत असल्याने भाजीमंडईत फळभाज्यांचे भाव किलोमागे २० ते ६० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
फळभाज्यांमध्ये श्रावणघेवडा (बिन्स) जास्त भाव खात आहे. आठवडाभरापूर्वी १२० रुपये किलोने विक्री होणारी ही भाजी सध्या १८० रुपये किलोने विकली जात आहे. म्हणजे ८ दिवसांत किलोमागे ६० रुपयांनी भाववाढ झाली आहे. पावभाजी व पुलाव तयार करण्यासाठी श्रावणघेवड्याचा वापर केला जातो.
टोमॅटो, कांदा सर्वात स्वस्तफळभाज्यांमध्ये टोमॅटो, कांदा सर्वात स्वस्त म्हणजे २५ रुपये किलोने विकत आहे. बटाटा, काकडी, पत्ताकोबी ४० रुपये किलोने विकत आहे.
मेथी २० रुपये जुडीउष्णतेमुळे पालेभाज्याही लवकर खराब होत आहेत. यामुळे पालेभाज्यांचे भावही वाढले आहेत. ८ दिवसांपूर्वी १५ रुपये जुडी विक्री होणारी मेथी भाजी सध्या २० रुपयांत मिळत आहे. तर १० रुपयांना मिळणारी पालक, करडी, चुका, कोथिंबीर सध्या १५ रुपये प्रति जुडी विकत आहे.
ओल्या पोत्यात झाकून ठेवत आहेत भाज्याउष्णतेची लाट सध्या सुरू आहे. भाज्या वाळून जाऊ नयेत, भाजी ताजी दिसावी यासाठी विक्रेत्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत आहे. कोणी थोड्या थोड्या वेळाने भाज्यांवर पाण्याची फवारणी करत आहे तर काही विक्रेते पाण्यात भिजविलेली पोती भाज्यांवर ठेवत आहेत. यासाठी विक्रेत्यांना दिवसभर सतत लक्ष ठेवावे लागत आहे.-विजय वाघमारे, भाजी विक्रेता
आठवड्याभरात वाढले भावफुलकोबी ६०रु---८०रूगवार ६०रु---८०रुवांगे ४०रु---८०रुशेवगा शेंगा ४०रु---८०रुशिमला मिरची ६०रु---८०रुभेंडी ६०रु---८०रुगवार ६०रु---८०रुपत्ताकोबी ३०रु---४०रु