शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
2
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
3
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
4
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
5
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
6
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
7
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
8
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
9
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
11
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
12
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
13
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
14
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
16
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
17
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
18
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
19
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
20
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...

बिनधास्त चोर ! सहकाऱ्याची दुचाकी चोरून त्याच्यासमोरच रंग बदलून वापरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 7:57 PM

He stole his colleague's bike and after changed the color used in front of him : चोरीच्या दुचाकीचा रंग बदलून टाकला मित्राच्या दुचाकीचा क्रमांक

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या नजरेत येताच पकडला गेलाआरोपीच्या साथीदाराचा शोध सुरू

औरंगाबाद : चोरलेली मोटारसायकल गाडीमालकाला ओळखता येऊ नये याकरिता चोरट्यांनी चक्क दुचाकीला रंगीत पट्ट्याचे स्टीकर लावले आणि मूळ नंबरप्लेट काढून मित्राच्या दुचाकीचा क्रमांक टाकला. एवढे करूनही आरोपी मात्र गुन्हे शाखेच्या नजरेतून सुटला नाही. पोलिसांनी त्याला चोरीच्या मोटारसायकलसह गुरुवारी अटक केली. दीपक डिगांबर सोनटक्के (२६, रा. राजनगर ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीचा साथीदार सोनू मुंडेचा पोलीस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे आरोपी ज्याच्यासोबत काम करतो त्याचीच दुचाकी चोरून रंग बदलून बिनधास्त वापरत असे.  

गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, हवालदार शेख हबीब , विजय निकम, राजेंद्र साळुंके यांचे पथक १७ जून रोजी गस्तीवर होते. यावेळी उल्कानगरी परिसरातील एका शाळेसमोर उभ्या दुचाकीजवळ संशयित आरोपी उभा दिसला. या दुचाकीवर रंगीबेरंगी पट्टे पाहून पोलिसांनी त्याला त्याचे नाव आणि पत्ता विचारला. यानंतर पोलिसांनी त्याच्या मोटारसायकलची कागदपत्रे, लायसन्स विचारले. तेव्हा ही मोटारसायकल त्याचा मित्र सोनू मुंडेची असल्याचे त्याने सांगितले. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर त्याला गुन्हे शाखेत नेऊन त्याची सखोल चौकशी केली. तसेच दुचाकीच्या चेसिस क्रमांकावरुन दुचाकीचा मालक शोधला असता दुचाकीवरील क्रमांक बनावट असल्याचे दिसून आले. या मोटारसायकलचा खरा (एम एच २० सी एक्स ६२८४) असा असल्याचे तसेच ही दुचाकी जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गतवर्षी चोरीला गेल्याची नोंद असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार सोनूच्या मदतीने ही मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. मित्राच्या मोटारसायकलचा क्रमांक त्याने या दुचाकीवर टाकला. पोलीस सोनू मुंडे याचा शोध घेत आहेत.

गाडीमालकासोबत काम करायचा आरोपीआरोपी दीपक सोनटक्के आणि या मोटारसायकल मालक सेंट्रिंग मिस्त्री म्हणून एकाच साईटवर एकत्र काम करीत होते. यासह मेस्त्रीची मोटारसायकल त्याने मुंडेला चोरी करायला लावली. यानंतर तीन महिने दुचाकी लपवून ठेवून दुचाकीचे रूप बदलले. मित्राच्या मोटारसायकलचा क्रमांक टाकून तो याच दुचाकीने कामावर ये - जा करू लागला. मोटारसायकल मालक यांच्यासमोर ही दुचाकी रोज येत होती. मात्र, आरोपीने केलेल्या बदलामुळे दुचाकीमालकाला त्यांची ही गाडी ओळखता आली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद