या ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात आला असून, तेथे संस्थेचे मानचिन्ह बसविण्यात आले आहे. इनरव्हील क्लब ऑफ औरंगाबाद लोटसतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. चेअरमन अनुराधा चांडक यांच्या हस्ते या मानचिन्हाचे अनावरण आणि लोकार्पण झाले. चांडक यांनी क्लबच्या कार्याचे कौतुक केले.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा तृप्ती चुडीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबविण्यात आला. हा प्रकल्प आपल्यासाठी अत्यंत महत्त्वकांक्षी असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, शहरातील मुख्य चौकात हे मानचिन्ह बसविण्यात आल्याने आता मदत मागायची कुणाकडे, हे सर्वसामान्य औरंगाबादकरांना कळेल आणि त्या माध्यमातून क्लब अधिकाधिक गरजवंतांपर्यंत पोहोचू शकेल. ललित पाटणी, उषा धामणे, शुभांगी कुलकर्णी, सचिव रेखा हिवरे यांची यावेळी उपस्थिती होती. येत्या काही दिवसांत रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा समस्या, पर्यावरण सुरक्षा असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे चुडीवाल यांनी सांगितले.
फोटो ओळ : इनरव्हीलच्या मानचिन्ह अनावरणप्रसंगी उपस्थित इनरव्हील क्लब ऑफ औरंगाबाद लोटसच्या सदस्या.