छत्रपती सांभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये 63 व्या दीक्षांत समारंभात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी (27 जून) गदारोळ केला. मंचावर बोलवून पदवी प्रमाणपत्र दिले नसल्याचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांनी गदारोळ केला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन दोन वेळा पदवीदान समारंभ घेण्याची नामुष्की ओढवली. त्यामुळे. राष्ट्रगीत संपल्यानंतर पुन्हा मंचावरून पदवीदान करण्यात आली.
शैक्षणिक सत्र 2022 दरम्यानच्या विद्यार्थ्यांना 63 व्या दीक्षांत समारंभात पदवी देण्यात आली. मात्र या समारंभात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना जाग्यावरच पदवी देण्यात आली होती. त्यामुळे दीक्षांत समारंभ संपल्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले. राष्ट्रगीत संपल्यानंतर राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी दीक्षांत सोहळा संपल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर सभागृहात पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुलगुरू प्रमोद येवले आणि दीक्षांतचे समारंभाचे पाहुण्या पंकज मित्तल यांना काही काळ सभागृहात काय सुरू आहे हे कळलेच नाही. काही विद्यार्थी जोर जोरात ओरडून पीएचडी पदवीचा अपमान आहे. 'आम्हाला जागेवरूनच प्रदान करायची होती तर आम्हाला बोलावले कशाला असा जाब विचारण्यास सुरुवात केली.' त्यानंतर कुलगुरू व्यासपीठावर गोंधळलेल्या अवस्थेत दिसले.
सूत्रसंचालन करणाऱ्या मस्तजिब् खान कुलगुरूंची पूर्वपरवानगी घेऊन पुन्हा एकदा पदवी देण्याची घोषणा केली. त्यानंतर दीक्षांत मिरवणूक सभागृहाच्या बाहेर गेले. दीक्षांत सभागृहात पुन्हा पदवीदान सोहळ्यासाठी मंचावर जायचे की नाही यावर खल करण्यात आला. सुमारे अर्धा तास यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉक्टर भारती गवळी. डॉक्टर गजानन सानप, दत्तात्रय चर्चा करायला गेले. विद्यार्थ्यांनी पुन्हा पदवी घेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर कुलगुरू, डॉक्टर मित्तल, चारही विद्याशाखांच्या अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषद सदस्य मंचावर आले. दीड वाजता पुन्हा पदवीदान सोहळा सुरू झाला. सभागृहात उपस्थित असलेल्या संशोधकांना 15 मिनिटात करण्यात आले.
कार्यक्रम राज्यपालांनी ठरवला- कुलगुरूकार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी केले होते. त्यांचा मिनिट टू मिनिट प्रोग्राम ठरलेला होता राज्यपालांनी फक्त दीड तासांचा वेळ दिल्यामुळे मंचावरून दीक्षांतसोहळ्यात पीएचडी देता आली नाही असे मत कुलगुरूंनी व्यक्त केले.