शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

UPSC Exam: ‘युपीएससी’च्या परीक्षेकडे ४० टक्के उमेदवारांची पाठ

By विजय सरवदे | Published: May 29, 2023 2:08 PM

या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारत सरकारच्या प्रशासकीय व इतर सेवांमध्ये केली जाते.

छत्रपती संभाजीनगर :केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (युपीएससी) रविवारी २८ मे रोजी देशभरात पूर्वपरीक्षेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमधील २५ केंद्रांवर झालेल्या या परीक्षेकडे तब्बल ४० टक्के उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.

सकाळी ९:३० ते ११:३० व दुपारी २.३० ते ४:३० अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतली जाते. ही देशातील सर्वांत प्रतिष्ठित परीक्षा समजली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेला बसतात. या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती भारत सरकारच्या प्रशासकीय व इतर सेवांमध्ये केली जाते. रविवारी झालेल्या पूर्वपरीक्षेसाठी शहरातील २५ केंद्रांवर ८ हजार १४० उमेदवार प्रविष्ठ झाले होते. प्रत्यक्षात मात्र, सकाळच्या सत्रात ४ हजार ८३५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. ३ हजार ३०५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरवली. दुपारच्या सत्रात ४ हजार ७६३ उमेदवार परीक्षेस उपस्थित होते, तर ३ हजार ३५७ उमेदवार गैरहजर राहिले. या परीक्षेत सकाळच्या सत्रात २०० गुणांचे १०० प्रश्न, तर दुपारच्या सत्रात २०० गुणांसाठी ८० प्रश्न होते. दुपारचा पेपर ‘सीसॅट’चा होता.

कडेकोट बंदोबस्तशहरातील सर्वच केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात ही परीक्षा झाली. महसूल व शिक्षण विभागाचे एकूण १,२०० अधिकारी - कर्मचारी परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी तैनात होते.

चकवा देणारे पर्यायसकाळी सामान्य अध्ययनाचा पेपर होता. मात्र, बहुपर्यायी प्रश्नांसाठी चकवा देणारे पर्याय असल्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले. याच पेपरचे गुण निकालासाठी ग्राह्य धरतात व ‘सीसॅट’चे किमान गुण मिळवले तरी चालतात. ‘सीसॅट’चा पेपर पहिल्यांदा तपासतात व त्यात आवश्यक तेवढे गुण मिळाले, तरच सामान्य अध्ययनचा पेपर तपासला जातो.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थीexamपरीक्षाAurangabadऔरंगाबाद