रिक्षांनी मीटरप्रमाणेच भाडे घ्यावे
औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या भाडे दराप्रमाणेच व मीटरप्रमाणेच रिक्षाचालकांनी भाडे आकारणी करावी. रिक्षांवर जाहिरात प्रसिद्ध करू नये. चालकाने गणवेश घालावा. वाहनाची वैध कागदपत्रे सोबत बाळगावी. क्यूआर कोड स्टिकर्स रिक्षाच्या दर्शनी भागात लावावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मैत्रेवार यांनी केले आहे.
रा.से.यो. तर्फे वर्धापनानिमित्त वृक्षारोपण
औरंगाबाद : रा. से. यो.च्या वर्धापनदिनानिमित्त शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेत रा.से.यो.तर्फे वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेतील आवारात गुळवेल, निगुर्डी, शतावरी अशा विविध प्रकारच्या ५० औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. सतीश देशपांडे, प्रा. दिगंबर गायकवाड, अभिजित सरकार, कार्यक्रम अधिकारी मनीषा गुजर, राहुल गावडे, अंजली नाईक, डॉ. शोभा बाविस्कर, विनी काळे, अनुराग साहू, संदीप सांगळे, अरुण घुगे, डॉ. फैय्याज शेख, आदींची उपस्थिती होती.