शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

UPSC Results : टेलरच्या नातवाची कमाल; सर्वस्व पणाला लावून शेवटच्या अटेंप्टमध्ये बाजी मारली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 8:04 PM

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून २१४ वा रँक प्राप्त केला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादच्या सुमीतचे ''यूपीएससी'' परीक्षेत यशसहाव्या अटेंप्टमध्ये मिळाले घवघवीत यश

औरंगाबाद : औरंगाबाद शहराच्या सीमेलगत असलेल्या शेंद्रा कमांगर येथील एका सर्वसामान्य टेलरचा नातू अथक परिश्रम घेऊन नागरी सेवेच्या (यूपीएससी) सर्वोच्च परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करतो, ही बाब त्याच्या कुटुंबियालाच नव्हे तर नव्या पिढीसाठीही आदर्शवत आहे.

जि.प. शिक्षण विभागातील वरिष्ठ विस्तार अधिकारी राजेश महाजन यांचे चिरंजीव सुमीत महाजन याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून २१४ वा रँक प्राप्त केला आहे. सुमीतचे वडील राजेश महाजन यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. त्यांचे वडील गावात टेलरींंगचे काम करायचे. त्यांनी आपल्या हालाखीच्या परिस्थितीही राजेश यांना शिक्षण दिले. ते आज फुलंब्री येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राजेश महाजन यांनीही आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुलाला चांगले संस्कार व शिक्षण दिले.

सुमीतने स.भु. महाविद्यालयात १२ वीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईतील व्हीजेएनटी महाविद्यालयात बी.टेक.(प्रॉडक्शन) पदवीचे शिक्षण २०१३ साली पूर्ण केले. प्रशासकीय सेवेचे बाळकडू त्याला घरातूनच मिळाले. अन्य नोकरी न करता यूपीएससीच्या माध्यमातून नागरी सेवेत करिअर करण्याचा त्याने निर्धार केला. कोणतेही क्लासेस न लावता पुण्यात राहून सुमीतने या परीक्षेचा अभ्यास केला. काही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले. तो तीनवेळा मुलाखतीपर्यंत पोहोचला, पण यश सतत हुलकावणी देत होते. तरीही खचून न जाता त्याने ही परीक्षा पुन्हा पुन्हा दिली. अखेर सहाव्या व शेवटच्या अटेंप्टमध्ये त्याला यश आले. सुमीतच्या या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.

सातत्य आणि जिद्दीने हमखास यश मिळतेसुमीत महाजन म्हणाला की, मी दिवसातून सात- आठ तास अभ्यास करायचो. परंतु, अभ्यास किती तास करावा, याला माझ्या मते जास्त महत्त्व नाही. तो नेमका करावा. यातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने टेक्स सिरीजचा अभ्यास करावा. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी अभ्यासातील सातत्य आणि जिद्द महत्त्वाची आहे.दोन मिनिटात काय करतोय 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगAurangabadऔरंगाबाद