शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

अँड्रॉईड मोबाईल वापरताय... मग काळजी घ्या..!

By admin | Published: November 10, 2014 11:43 PM

दत्ता थोरे, लातूर आपल्याकडे अँड्रॉईडचा मोबाईल आहे आणि त्यावर तुम्ही इंटरनेट वापरताय ? मग सावधान तुमच्या फोनला हातही न लावता त्यामधील माहिती कुणी तरी चोरुन शंभर टक्के बघत असणार.

दत्ता थोरे, लातूरआपल्याकडे अँड्रॉईडचा मोबाईल आहे आणि त्यावर तुम्ही इंटरनेट वापरताय ? मग सावधान तुमच्या फोनला हातही न लावता त्यामधील माहिती कुणी तरी चोरुन शंभर टक्के बघत असणार. त्यामुळे मोबाईल वापरताना काळजी घ्या... हा सल्ला आहे मोबाईल सिक्युरिटीत जर्मनीच्या बर्लिन विद्यापीठात पीएचडी केलेल्या लातूरच्या रवी बोरगावकरचा. लातूरचा रवी बोरगावकर हा गाण्यातल्या बोरगावकर परिवारातील डॉ. भास्कर बोरगावकरांचा मुलगा. या घरातील गाणं सोडून अशा वेगळ्या वाटेने गेलेला हा एकमेव मुलगा. शालेय शिक्षण लातूरच्या केशवराज विद्यालयात, महाविद्यालयीन शिक्षण ‘दयानंद’मध्ये केलेल्या रवीने नांदेडच्या एसजीएस गुरु गोविंदसिंह अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरींग केल्यानंतर स्विडन आणि फिडलँड येथून एमएस आणि जर्मनीच्या बर्लिन येथील टेक्नीकल युनिव्हर्सिटीतून पीएच.डी केली. पीएच.डीला त्याचा विषय होता ‘सिक्युरिटी इन टेलिकम्युनिकेशन्स’.संशोधन झाल्यानंतर रवि बोरगावकरला ‘टी मोबाईल’ या कंपनीमध्ये सिनिअर रिसर्च इन मोबाईल नेटवर्क सिक्युरिटी म्हणून नोकरी मिळाली. आता गेल्या चार वर्षांपासून तो यावर काम करतोय. महाविद्यालयात शिकतानाच त्याने एका कंपनीला त्यांच्या मोबाईलमधील दोन त्रुटी सांगितल्या नंतर त्या कंपनीनी त्यास दोन स्मार्टफोनची भेट दिली होती. मोबाईल सिक्युरिटीची इंडस्ट्री ही खूप मोठी असल्याचे रवी सांगतो, ही सिक्युरिटी फोडणाऱ्याला कोट्यवधीत पैसे मिळतात. ही सिक्युरिटी फोडणारे अनेक सॉफ्टवेअर बाजारात (ज्याला या परिभाषेत डार्क मार्केट म्हणतात) बेकायदेशीरपणे विकले जातात. तसेच असे मोबाईल सिक्युरिटी फोडणारे व्हायरस शोधून त्यांच्या वाटा रोखणाऱ्यांनाही संरक्षक भिंतीचे पैसे मिळतात. आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस घुसवून माहिती काढणारा आपले संवाद ऐकू शकतो किंवा आपल्या परस्पर आपला मोबाईल हात न लावताही वापरु शकतो. ४१) आपल्या इंटरनेट युज असलेल्या मोबाईलवर गुगलचा पूर्ण कंट्रोल आहे. कंपनी सिक्युरिटीच्या मुद्यांवर त्यांचे बरोबर आहे. पण ही सारी माहिती आपल्याही नकळतपणे त्यांच्याकडे असते. ४२) सीडीआर रेकॉर्ड : प्रत्येक मोबाईल कंपन्यांच्या आॅपरेटरकडे हा डेटा असतो. परंतु ते कोर्ट अथवा पोलिसाशिवाय दुसऱ्या कुणाला देत नाहीत. परंतु अवैधरित्या हा डाटा मिळविला जातो. ४३) टारगेटेड अटॅक्स : अँड्रॉईड फोनला व्हायरस एसएमएस पाठवायचा. त्याला क्लिक केलं की एखादा सॉफ्टवेअर आपोआप डाऊनलोड होतं. त्याची कनेक्टीव्हिटी दुसऱ्याला मिळते आणि तो रिमोटने तुमचा फोन वापरू शकतो. अगदी बाहेर देशात बसून आपला मोबाईल वापरु शकतो. आपल्या मोबाईलमध्ये असलेले सारे पासवर्ड वापरु शकतो. कोणतेही अ‍ॅप टाकताना ते आपली काय इनफॉर्मेशन मागते आहे ते काळजीपूर्वक पहावे४आपल्या बँकेचे व्यवहार फोनवरुन करणे शक्यतो टाळावे४खासगी फोटो, व्हिडीओ हे मोबाईलमध्ये ठेवू नयेत. कारण तो खराब झाला किंवा हरविला तर ती माहिती लिक होऊ शकतेच परंतु हॅकर ती माहिती हॅक करु शकतात. ४फेसबुक, व्हाटस् अ‍ॅप असे अप्लिकेशन वापरताना लोकेशन कळू नये म्हणून जीपीएस बंद करुन ठेवावेत. ४इनक्रिप्टीपेड अ‍ॅप्स मार्फत फोटो माहिती पाठवलेली चांगली. असे इनक्रिप्टीटेड अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध आहेत जे आपण मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन त्यात स्टोअर करुन पिनकोड टाकला तर त्या पिनशिवाय दुसऱ्या कुणाला दिसणार नाहीत. ४दुसऱ्याच्या वायफान वरुन फेसबुक आणि व्हाटस् अ‍ॅप वापरताना काळजी घ्यावी कारण त्या वायफायवाल्याला आपली माहिती घेता येऊ शकते. ४ जन्मतारखा, पॅनकार्ड नंबर, बँक अकाउंट नंबर, इंडस्ट्रीज बाबतची महत्त्वाचे कोड, एटीएम पासवर्ड हे मोबाईलमध्ये कळतील अशा भाषेत ठेवू नये अथवा पाठवू नये.