वेबिनारमध्ये कोरोनाविषयी डॉ. आनंद निकाळजे यांनी माहिती दिली. अनावश्यक तपासण्या, सिटी स्कॅन, तसेच अनावश्यक औषधे घेणे टाळा, तसेच डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कुठल्याही तपासण्या न करणे आणि स्वतःच्या मनाने औषधी घेणे टाळणे, यावर त्यांनी भर दिला.
डॉ. गणेश कुलकर्णी यांनी सध्या उपलब्ध असलेल्या सर्व लसींबद्दल माहिती दिली. डॉ. अपर्णा प्रभू या वेबिनारमध्ये लंडनहून सहभागी झाल्या होत्या. त्यांनी युरोपातील कोविड लाट आणि भारतातील चित्र यांचे विवेचन केले. कोविडपासून मुक्ती मिळवण्यासाठी लसीकरण हाच एक आपल्या हातातील पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्ध असलेल्या सगळ्या लसी या परिणामकरक असून, त्यामुळे आजार चिंताजनक होण्याची शक्यता बऱ्याचअंशी कमी होते, यावर सर्वच जगभरातील तज्ज्ञांचे एकमत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. कुमार दुस्सा हे मुंबईहून या वेबिनरमध्ये सहभागी झाले होते. या वेबिनारचे आयोजन गेटगोईंगच्या पदाधिकारी डॉ. प्रिया देशमुख, डॉ. नीती सोनी, डॉ. चारुशीला देशमुख आणि निरुपमा नागोरी यांनी केले होते.