अहवालाची प्रतीक्षा : औरंगाबाद, परभणीतील घटनेनंतर तपासणीऔरंगाबाद : औरंगाबादेतील गांधेलीसह परभणीमध्ये लसीकरणानंतर झालेल्या बालकांच्या मृत्यूच्या घटनांमुळे आरोग्य विभागाने संबंधित लसींचे नमुने तपासणीसाठी थेट हिमाचल प्रदेशातील प्रयोगशाळेत पाठविले आहे. प्रयोगशाळेतील अहवालानंतर सत्य परिस्थिती समोर येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गांधेली येथे २ नोव्हेंबर रोजी लसीकरणाचे आयोजन केले होते. याविषयी माहिती देण्यात आल्यानंतर इल्मा इम्रान सय्यद या बालिकेला कुटुंबियांनी नियमित लसीकरणासाठी दुपारी १२ उपकें द्रात नेले होते. यावेळी तिला पेन्टाव्हॅलेन्ट ही लस देण्यात आली. ३ नोव्हेंबरच्या पहाटे ३ वाजेच्या सुमारास तिची प्रकृती अधिकच खालावली.
त्यामुळे कुटुंबियांनी तिला शिवाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी घाटीत नेण्याचा सल्ला दिल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानुसार घाटीत नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी इल्माला मृत घोषित केले. याप्रक रणी जिल्हा संनियंत्रण समिती आणि प्राथिमक तपासणी अहवालानुसार सदर मृत्यू हा लसीकरणाच्या प्रतिकूल प्रक्रियानुसार झालेला नसल्याचे नमूद केले. तरीही संबंधीत लसीचे नमुने हिमाचल प्रदेशातील कसोली येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
आठवडाभरात अहवालहिमाचल प्रदेशातील कसोली येथील नॅशनल व्हॅक्सीन इन्स्टिट्यूट याठिकाणी मान्यताप्राप्त तपासणी होते. औरंगाबादेतील लसीचा नमुण्याचा अहवाल पुढच्या आठवड्यात प्राप्त होईल, त्यानंतर परभणी येथील अहवाल प्राप्त होईल. असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले.