शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

घाटी रुग्णालयात औषधी टंचाई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 12:51 AM

घाटी रुग्णालयासह राज्यभरात १ सप्टेंबरपर्यंत १४३ आजारांसाठीच्या औषधींचा साठा दाखल होईल, असा दावा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी केला होता; परंतु घाटीत हा साठा अद्याप आलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयासह राज्यभरात १ सप्टेंबरपर्यंत १४३ आजारांसाठीच्या औषधींचा साठा दाखल होईल, असा दावा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी केला होता; परंतु घाटीत हा साठा अद्याप आलेला नाही. त्यामुळे रुग्णालयातील औषध टंंचाई कायम असल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल सुरूच आहेत.न्यायालयीन प्रकरणानिमित्त डॉ. शिनगारे शहरात आले असताना त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता. त्यावेळी १ सप्टेंबरपर्यंत औषधींचा पुरवठा होणार असल्याचे ते म्हणाले होते. घाटी रुग्णालयात सोमवारी माहिती घेतली असता अद्याप औषधी प्राप्त झालेली नसल्याची माहिती समोर आली. घाटीत दररोज मराठवाड्यासह विदर्भ आणि लगतच्या भागातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात.यामध्ये एकट्या बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात दररोज १,७०० ते २,००० रुग्णांवर उपचार होतात. यातील अनेकांना आंतररुग्ण विभागात दाखल केले जाते. घाटीत गेल्या वर्षभरापासून औषधांची टंचाई आहे.प्रतिजैविके, अ‍ॅन्टिरेबीज व्हॅक्सिन, मेट फारमिन, आयसो सरबाईट, अशा मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यातही गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून औषधींची खरेदी करावी लागत आहे.औषधी खरेदी घोटाळ्यांना पायबंद घालण्यासोबतच तिच्या खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ‘हाफकिन’कडूनच औषधी खरेदी होणार आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून घाटी रुग्णालयास औषधी उपलब्ध होण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे.सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण असा दोन्ही विभागांची एकत्र औषधी खरेदी ‘हाफकिन’ला अवघड होते. त्यामुळे त्यांनी दर तीन महिन्यांचा एक अशा चार टप्प्यांत याद्या,अशी सूचना केली. त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात आणखी उशीर झाला. या सगळ्या प्रक्रियांच्या गोंधळात घाटी रुग्णालयात औषधींची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्याचा भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलmedicinesऔषधं