औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी विभागाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे; परंतु पाणी आणि विजेच्या जोडणीअभावी हा विभाग रेंगाळला आहे.
‘एचएससीसी’ या एजन्सीच्या माध्यमातून या विभागाची उभारणी करण्यात येत आहे. या एजन्सीचे प्रतिनिधी एस.के. भटनागर, जैनेश चहल यांनी विभागाच्या कामाविषयी माहिती दिली. विभागाची उभारणी पूर्णत्वास आली असून, केवळ वीज आणि पाण्याच्या जोडणीचे काम शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले. विजेच्या जोडणीअभावी रुग्णालयातील विजेसंदर्भातील अनेक कामांची साधी चाचणीदेखील घेता येत नसल्याचे समजते.
घाटीतील सुपरस्पेशालिटी विभागाच्या कामांमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. सप्टेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण झाले पाहिजे. एक दिवसही वर होता कामा नये, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी २२ जुलै रोजी कंत्राटदाराला दिली होती; परंतु चौबे यांनी दिलेली डेडलाईन हुकली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाºया २२० खाटांच्या स्वतंत्र सुपरस्पेशालिटी विभागाच्या इमारतीचे कामकाज डिसेंबर-२०१७ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही.
रखडणार नाहीसुपरस्पेशालिटी विभागाची उभारणी ही रुग्णालयासाठी भूषणावह गोष्ट आहे. या विभागाचा जनतेला मोठा फायदा होईल. हा विभाग वीज आाणि पाण्यासाठी रखडणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रभारी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.