लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडून दहा लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडलेले जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर यांचे पुण्यातील उच्चभू्र वसाहतीत कोट्यवधी रुपये किमतीचे बंगले आणि बँकांमध्ये लॉकर असल्याचे समोर आले. त्यांच्या बंगल्याची झडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेतली जाणार आहे.याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वर्षाराणी पाटील म्हणाल्या की, वाल्मीचे महासंचालक आणि जलसंधारण आयुक्तालयाचे आयुक्त अशी दोन पदे गोसावी सांभाळत होते, तर क्षीरसागर हे त्यांच्या अधीक्षक अभियंता दर्जाचे अधिकारी असून, ते सहसंचालकपदी कार्यरत आहेत.तक्रारदार हे त्यांच्या अधिपत्याखालील एका संस्थेत प्राध्यापक आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपींनी त्यांना बोलावून घेत तुमची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने झाली असून, तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. तुम्हाला निलंबित करण्यात येणार आहे. निलंबनाची कारवाई न करण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया थांबविण्यासाठी आरोपींनी दहा लाखांची लाच मागितली. २९ डिसेंबर रोजी वाल्मीतील कार्यालयात गोसावी यांनी क्षीरसागर यांच्यामार्फत लाचेची रक्कम तक्रारदाराकडून घेताना पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर पोलिसांनी आरोपींच्या येथील शासकीय निवासस्थानाची झडती घेतली. या घरझडतीत फारसे काही पोलिसांच्या हाती लागले नाही. गोसावी यांचे पुण्यातील शिवाजीनगर येथे तर क्षीरसागर यांचा सिंहगड सिटीमध्ये अलिशान बंगलो असल्याचे चौकशीत समोर आले. या बंगल्यांची किंमत कोट्यवधी रुपये आहे.शिवाय उभयतांची पुणे येथील बँकांमध्ये लॉकर आहेत. या लॉकरची तपासणी केली जाणार आहे. या लॉकरमध्ये काय मिळते, शिवाय त्यांच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. त्यांच्या खात्यातून किती रकमेचे व्यवहार झाले, याबाबतची पडताळणी केली जाणार आहे.आरोपींना मिळाली पोलीस कोठडीतक्रारदार प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई न करता त्यांची शैक्षणिक कागदपत्रे त्यांना परत देण्यासाठी दहा लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल, २९ डिसेंबर रोजी सापळा रचून रंगेहाथ पकडलेले वाल्मीचे महासंचालक हरिभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले.च्सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी त्या दोघांना ४ जानेवारी २०१८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शासनातर्फे जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी काम पाहिले.एका बंगल्याची झडतीगोसावी यांच्या बंगल्यात सध्या कोणीही नसल्याने तेथे पोलीस गार्ड लावण्यात आला, तर क्षीरसागरच्या बंगल्याची झडती पुणे लाचलुचपत प्रतिबंधकचे अधिकारी घेणार आहेत. गोसावी यांचे नातेवाईक घरी आल्यानंतर त्यांच्याही बंगल्याची झडती घेतली जाईल.माचेवाडला नेले नांदेडलाच्शेतकºयाकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीय सहायकामार्फत दहा हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आलेले सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांच्या नांदेड येथील घराची झडती घेण्यासाठी त्यास सोबत घेऊन पोलीस नांदेडला गेले आहेत.
वाल्मीच्या संचालकांकडे कोट्यवधींचे बंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:13 AM