शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

शहरात विद्रुपीकरणाचा पुन्हा बोलबाला; होर्डिंगच्या कारवाईसह धोरणाकडे मनपाचे दुर्लक्ष

By मुजीब देवणीकर | Published: January 15, 2024 1:46 PM

मनपाने ठरविलेल्या ८० ठिकाणांवरच होर्डिंग लागले पाहिजेत, या धोरणाला प्रशासनानेच हारताळ फासला आहे.

छत्रपती संभाजीनगर : पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरात चौकाचौकात लहान- मोठे होर्डिंग झळकत आहेत. वाढत्या विद्रुपीकरणावर खंडपीठाने महापालिकेचे वेळोवेळी कानही टोचले. त्यानंतरही काहीच उपयोग झालेला नाही. आजही शहरात हजारोंच्या संख्येने अनधिकृत होर्डिंग चौकाचौकात झळकत आहेत. मांजा विकणाऱ्यांवर, गुंठेवारी न करणाऱ्यांवर बुलडोझर चालविण्याची भाषा करणाऱ्या प्रशासनाला होर्डिंग बहाद्दर चालतात का, असा प्रश्न निर्माण होत आहे. मनपाने ठरविलेल्या ८० ठिकाणांवरच होर्डिंग लागले पाहिजेत, या धोरणाला प्रशासनानेच हारताळ फासला आहे.

पर्यटकांची संख्या वाढावी, इंंदूरपेक्षा शहर स्वच्छ झाले पाहिजे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम, महापालिकेची २२ मजली प्रशासकीय इमारत, ग्लो गार्डन अशा अनेक प्रकल्पांवर महापालिका काम करीत आहे. शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गुणवत्तेच्या आधारावर जगभरात शहराचे नावलौकिक करणाऱ्या कंपन्या आहेत. मात्र, छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरात आलेले पाहुणे नावे ठेवतात. साधे होर्डिंगचे उदाहरण घ्यायचे तर महापालिकेकडे धोरणच नाही. विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते जिथे जागा दिसेल तेथे होर्डिंग लावून मोकळे होतात. हे होर्डिंग अनेक दिवस तसेच लटकलेले असतात. महापालिकेचा अजिबात धाक नसल्याचे हे परिणाम आहेत. होर्डिंगचा विषय खंडपीठाशी निगडित असल्याने अधिकाऱ्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

खंडपीठाच्या आदेशाची पायमल्लीशहरात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जागा मिळेल तेथे अनधिकृत होर्डिंग्ज लावत होते. शहर विद्रुपीकरण थांबावे, म्हणून मनपाने खंडपीठाच्या आदेशानुसार होर्डिंग्ज लावण्यासाठी मनपाने मागील वर्षी जागा निश्चित केल्या होत्या. होर्डिंग लावणाऱ्यांना किमान तीन व जास्तीत जास्त पाच दिवसांची मुदत दिली जाईल, होर्डिंग्जच्या आकारानुसार शुल्कही आकारले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. हे धोरण कागदावरच राहिले.

८० जागा केल्या होत्या निश्चितझोन एक ते नऊ कार्यालयांतर्गत ८० जागा निश्चित केल्या होत्या. वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, यादृष्टीने पोलिसांच्या अभिप्रायानुसार जागा निश्चित केल्या होत्या. झोन कार्यालय एकअंतर्गत २१ जागा, झोन दाेनमध्ये १४, झोन तीनमध्ये दाेन, झोन चारमध्ये १२, झोन पाचमध्ये सात, झोन सहामध्ये १२, झोन सातमध्ये सात, झोन आठमध्ये नऊ आणि झोन नऊमध्ये चार जागा निश्चित केल्या होत्या.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका