शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

विविध आंब्यांचा बाजारात दरवळ, पण आमरस खवय्यांना अक्षय्य तृतीयेची प्रतीक्षा

By प्रशांत तेलवाडकर | Published: April 04, 2024 6:03 PM

अजूनही मोठा वर्ग असा आहे, जो अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवासमोर आंब्याचा नैवेद्य दाखवून नंतरच आमरस खाण्यास सुरुवात करतात.

छत्रपती संभाजीनगर : विविध आंब्यांचा दरवळ बाजारात पसरू लागला आहे. काहींनी महिनाभर आधीपासूनच आंबे खाण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अजूनही अनेक ग्राहक असे आहेत की, ते अक्षय्य तृतीयेपासून आमरस खाण्यास सुरुवात करतात. मात्र, यास आणखी महिनाभराचा अवधी बाकी आहे. तोपर्यंत खवय्यांना उत्तम आंब्यांची प्रतीक्षा आहे.

साधारणत: फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात आंब्यांचे आगमन होते. ज्या किमतीत आंब्याची पहिली पेटी मिळेल त्या भावात खरेदी करणाऱ्या खवय्यांची संख्या शहरात कमी नाही. जसजसे आंबे बाजारात उपलब्ध होऊ लागले तसतसे रसाळी सुरू झाली आहे. चार ते पाच चवीचे आंबे बाजारात असून भावही आवाक्यात असल्याने आंब्यांची विक्री वाढली आहे. मात्र, अजूनही मोठा वर्ग असा आहे, जो अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवासमोर आंब्याचा नैवेद्य दाखवून नंतरच आमरस खाण्यास सुरुवात करतात.

४४ दिवस मनसोक्त आंब्यावर मारा तावअनेक कुटुंबांत परंपरा आहे की, अक्षय्य तृतीयेला आमरस खाण्यास सुरुवात करतात व वटपौर्णिमेनंतर आंबे खाण्यास बंद करतात. १० मे रोजी अकय्य्य तृतीया व २१ जूनला वटपौर्णिमा आहे. ४४ दिवस हे खवय्ये आंब्यावर मनसोक्त मारू शकतात. मात्र, या खवय्यांना आणखी महिनाभर आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.

कोणते आंबे बाजारातरमजान महिना सुरू असून रोजे (उपवास) सोडण्यासाठी आमरस खाल्ला जातो. यामुळे आंब्यांना मोठी मागणी आहे. बाजारात बदाम, केशर, लालबाग, मलाईका व हापूस असे पाच जातीचे आंबे सध्या बाजारात विकले जात आहे. केशर आंबा कर्नाटक राज्यातून येत आहे. आपल्याकडील अस्सल केशर आंबा मेच्या दुसऱ्या पंधरवड्यात बाजारात दाखल होईल.

काय भावात मिळतोय आंबाप्रकार भाव१) बदाम १२०-१५० रु२) केशर १८०-२००रु३) लालबाग १००-१२०रु४) मलाइका १५०-१६०रु

हापूस आंब्याचा भाव उतरलासध्या बाजारात रत्नागिरी, देवगड तसेच कर्नाटक, हैदाबाद येथून हापूस आंबा विक्रीला येत आहे. अस्सल खवय्येच रत्नागिरी व देवगडचे आंबे ओळखू शकतात. १० दिवसांपूर्वी ९०० ते १२०० रुपये प्रति डझनने विक्री होणारा हापूसची आवक वाढताच भाव कमी होऊन सध्या ६५० ते १ हजार रुपये प्रति डझन विकत आहे.

टॅग्स :MangoआंबाAurangabadऔरंगाबादMarketबाजार