लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी शहरात गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन झाले. यापाठोपाठ रविवारी सायंकाळी वरुणराजानेही दमदार हजेरी लावली. शहरासह परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे सगळीकडे चांगलाच गारवा पडला होता.मराठवाड्याला दीड महिन्यापासून हुलकावणी देणाºया पावसाचे पुनरागमन मागील आठवड्यात झाले होते. तेव्हा मराठवाड्यात सर्वदूर पाऊस झाला. यानंतर सतत दोन- तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर अधूनमधून पाऊस पडत होता. मात्र शुक्रवारी गणपतीच्या आगमनापासून वातावरणात उकाडा निर्माण झाला होता. ढग आले तरी वरुणराजा बरसत नव्हता. रविवारी सायंकाळी सहा वाजेनंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. चिकलठाणा वेधशाळेत रात्री साडेआठ वाजेपर्यंत ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली
वरुणराजाचे दमदार आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:57 AM