लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी पिसाळलेल्या श्वानाने किराडपुरा, रहेमानिया कॉलनीत तब्बल १८ चिमुकल्यांचे लचके तोडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. मोकाट श्वानांच्या प्रश्नावर महापालिकेवर टीकेची प्रचंड झोड उठविण्यात आली. प्रकरण अंगलट येण्यापूर्वीच मोकाट श्वानांची नसबंदी करण्यासाठी मनपाच्या पशुसंवर्धन विभागाने शनिवारी निविदा प्रसिद्ध केली. त्यामुळे मागील चार वर्षांपासूनबंद पडलेल्या श्वान नसबंदीशस्त्रक्रिया नवीन वर्षात सुरू होतील.या कामात पुण्याच्या एका खाजगी संस्थेचीही मदत घेण्यात येणारआहे.महापालिकेच्या अंदाजानुसार शहरात ४० हजारांहून अधिक मोकाट श्वान आहेत. वस्तुस्थिती यापेक्षा निराळी आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या लाखाच्या घरात पोहोचली आहे. रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शहरातील मुख्य, अंतर्गंत रस्त्यांवर श्वानांचेच अधिराज्य असते. दुचाकी वाहनस्वार कोणत्याही मुख्य रस्त्याने सुखरूप ये-जा करूच शकत नाही. श्वानांच्या टोळ्याच त्याच्यामागे लागतात. अनेकदा यातून गंभीर अपघातही झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी जळगाव रोडवर दिवसा कुत्रा वाहनासमोर आल्याने दुचाकीस्वार घसरून मरण पावला. मोकाट कुत्र्यांना उघड्यावरील मांसविक्रीही तेवढीच कारणीभूत आहे. जळगाव रोड, पडेगाव रोड, जटवाडा रोड, बीड पायपास, हर्सूल रोडवर दिवसभर फुकटचे मांस खाऊन श्वान रात्री वाहनधारकांना सळो की पळो करून सोडतात. यावर महापालिकेचे कुठेच अंकुश नाही.दोन दिवसांपूर्वीच किराडपुरा भागातील रहेमानिया कॉलनीत एका पिसाळलेल्या श्वानाने तब्बल १८ लहान चिमुक्यांचे लचके तोडले. अवघ्या पाच ते बारा वयोगटातील जखमी मुलांना पाहून कोणाच्याही हृदयाला पाझर फुटू शकतो. एवढी भयानक ही घटना होती. पिसाळलेल्या कुत्र्याला नागरिकांनीच पकडून मनपाकडे स्वाधीन केले. नंतर मनपाने या कुत्र्याला थेट यमसदनी पाठवून दिले.या घटनेने महापालिकेवर टीकेची प्रचंड झोड उठली. राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर पशुसंवर्धन अधिकारी बी. एस. नाईकवाडे यांना घेरावहीघातला.
श्वानांच्या नसबंदीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 12:01 AM