शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

आघाडीसाठी 'वंचित'ची दारे उघडीच; ओवेसींनी निर्णय घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 3:32 PM

प्रस्ताव एमआयएमकडून आल्यास तो प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचवू

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात आप मतविभागणी होऊ नये म्हणून समविचारी पक्षांचा विचार

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वत:हून वंचित बहुजन आघाडीपासून दूर गेली; पण अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची दारे एमआयएमसाठी  उघडीच असल्याचे त्यावेळीच स्पष्ट केले होते. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता निर्णय  बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनी घ्यायचा आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक फारुक  अहमद यांनी आघाडीची इच्छा व्यक्त केली. तसा प्रस्ताव एमआयएमकडून आल्यास तो आम्ही प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचवू व यावर अंतिम निर्णय तेच घेतील, असेही त्यांनी स्पष्ट के ले. 

आम आदमी पार्टी वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असल्याचे सांगत फारुक कमाल  दुपारी पत्रकारांना म्हणाले की, औरंगाबाद मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी हा सक्षम पर्याय आहे. औरंगाबाद प्रारंभीपासूनच वंचित बहुजन आघाडीचा गड राहिलेला आहे. भारिप-बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी एकत्रित झाल्यानंतर इथे आमची मोठी ताकद आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व जागा लढवण्याचीही तयारी सुरू आहे.  मतविभागणी होऊ नये म्हणून समविचारी पक्षांचा आम्हाला विचार करायचा आहे. 

वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधण्यासाठी फारुक अहमद, संतोष सूर्यवंशी व धम्मपाल सोनटक्के हे तीन निरीक्षक आले होते. मजनू हिलवरील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात हा संवाद साधण्यासाठी दुपारी १ ची वेळ देण्यात आली होती. मात्र, दुपारी अडीच-तीन वाजेपर्यंत निरीक्षकच आले नव्हते. ते आले आणि त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ओबीसी नेते वंबआमधून बाहेर पडत आहेत, याकडे लक्ष वेधताच फारुक अहमद उत्तरले, एससी, एसटी व ओबीसीतील वंचित हा आमचा पाया आहे. तो मजबूतच आहे. अकोल्यात ज्यांना तीस वर्षे संधी दिली, त्यांना नवे कार्यकर्ते नकोच असतील तर ते गेल्याने पक्षावर फारसा परिणाम होणार नाही. प्रदेश महासचिव अमित भुईगळ, प्रभाकर बकले, योगेश बन, शाम भारसाकळे, रवी तायडे, अ‍ॅड. लता बामणे, वंदना नरवणे आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक