औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुल येथे आजपासून सुरू झालेल्या के.डी. गादिया स्मृती चषक जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत वेदात सरकार, स्पर्श पाटणी, चंद्राषू यांनी विजयी प्रारंभ केला आहे. या स्पर्धेत ५३९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.आज झालेल्या पहिल्या फेरीत १0 वर्षांखालील मुलांच्या गटात वेदांत सरकार याने हर्ष संसारे याचा १५-१७,१५-१०, स्पर्श पाटणी याने पवन पवार याचा १५-०६, १५-०९ आणि चंद्राषू गुंडले याने आदित्य धूत याचा १५-४, १५-० असा पराभव केला.मुलींच्या गटात संजना राजपूत हिने शालिनी महाजन हिच्यावर १५-६, १५-२ अशी मात केली. शर्वरी निटूरकर हिने सान्वी होलंबे हिच्यावर १५-३, १५-१३ असा विजय मिळवला. मुलांच्या १३ वर्षांखालील वयोगटात प्रज्वल बोर्डेने आरुष याच्यावर १५-१0, १२-१५, १५-११ अशी मात केली. कौशल कुलकर्णी याने आर्यन मारा याच्यावर १३-१५, १५-८, १५-१0 असा विजय मिळवला. मुलींच्या गटात सिया बेंबडे हिने प्राप्ती साळवे हिच्यावर १५-१, १५-0 तर मुस्कान देशमुख हिने सांची ढेपे हिच्यावर १५-५, १५-४ अशी मात केली. पूर्वी गोयल हिने सृष्टी रोजेकर हिचे आव्हान १५-७, १५-१ ने मोडीत काढले. तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते झाले. त्यांच्याच हस्ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकणाऱ्या सोनाली मिरखेलकर हिचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी प्रास्ताविक केले. सचिव सिद्धार्थ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नरेश गुंडले यांनी आभार मानले. याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष वीरेंद्र पाटील, नितीन इंगोले, मिलिंद देशमुख, अतुल कुलकर्णी, जावेद पठाण, हिमांशू गोडबोले, ऋतुपर्ण कुलकर्णी, प्रभू रापतवार यांची उपस्थिती होती.
वेदांत, स्पर्श यांचा विजयी प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:53 AM