वाळूज महानगर: वाळूज-कमळापूर रस्त्याचे काम कासवगतीने सुरु असून, पर्यायी रस्ता नसल्यामुळे वाहनधारक नागरी वसाहतीतून ये-जा करीत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीत दुचाकीसह चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे.
गत दीड महिन्यापासून या रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वसाहतीत वास्तव्यास असणाऱ्या वाहनधारक नागरिकांना हनुमाननगर तसेच अण्णाभाऊ साठेनगरातून ये-जा करावी लागत आहे. नागरी वसाहतीतून वाहनाची सारखी वर्दळ सुरु असल्यामुळे घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलांना सावरतांना पालकांची दमछाक होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे.