लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरात बेशिस्त पद्धतीने वाहने उभी केली जातात. त्यामुळे ये-जा करणाºया वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. शिवाय अनेकदा अपघाताच्या किरकोळ घटनांही घडतात. वाहतूक शाखेतर्फे कारवाई करूनही याला आळा बसत नसून शहरातून सुसाटपणे दुचाकीस्वार धावताना दिसतात. तसेच वाहनांच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.हिंगोली शहरातील गांधी चौक, जवाहर रोड, बसस्थानक आदी गर्दीच्या ठिकाणी ये-जा करणाºया वाहनांची नेहमी वर्दळ असते. पालिकेतर्फे मुख्य चौका-चौकात वाहतूक सिग्नल बसविण्यात आले असले तरी ते सुरळीत होण्यापूर्वीच बंद पडले. लाखो रूपये खर्च करून सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र दुरूस्तीअभावी सिग्नल बंदावस्थेतच आहेत. सुविधा असूनही सिग्नलचा उपयोग नाही. शिवाय संबंधित विभाग याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सुट्या संपताच शाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील वाहतूक शिस्तीत आणून नियोजन करणे गरजेचे आहे.शहरातील विविध शाळा मुख्य मार्गावर आहेत. शाळा सुटल्यानंतर याच रस्त्याने विद्यार्थी ये-जा करतात. भरधाव वाहने या विद्यार्थ्यांसाठी थांबायलाच तयार नसतात. त्यामुळे अपघाताचा धोका कायम राहतो. ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यात वाहनांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी तरी वाहतुकीला शिस्त लावणे गरजेचे आहेवाहतूक शाखेतर्फे मोहीम- वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम वाहतूक शाखेतर्फे केले जाते. शिवाय दरदिवशी मोहीम राबवून पोलिसांकडून कारवाई केली जाते. मोहीम राबविण्यासाठी चौका-चौकात पोलीस उभे असतात. परंतु दंड व कारवाई यापलिकडे वाहतुकीला शिस्त लागणे तितकेच महत्त्वाचे आहे. चालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
हिंगोली शहरातून वाहने सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:10 AM