शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

‘आरटीओ’च्या वाहनांनाच नाही इन्शुरन्स, पीयूसी; इतरांना दंड, कार्यालयीन वाहनांकडे दुर्लक्ष

By संतोष हिरेमठ | Published: March 09, 2023 6:53 PM

नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, दंडात्मक कारवाई

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, आरटीओ कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी ज्या वाहनांच्या मदतीने प्रवास करतात, ज्यातून इतरांवर कारवाई करतात, त्या वाहनांनाच इन्शुरन्स, पीयूसी नसल्याची धक्कादायक बाब ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार देशभरात जवळपास ४० ते ५० टक्के वाहने इन्शुरन्स नसतानाही धावत आहे. नियमानुसार प्रत्येक वाहनाचा थर्ड पार्टी विमा असणे आवश्यक आहे. यातून अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी मदत होते. ‘पीयूसी’मुळे प्रदूषण नियंत्रणाला हातभार लागतो. तसेच भंगार वाहने रस्त्यावर धावण्यापासून रोखताही येतात. त्यामुळे पीयूसी, इन्शुरन्स नसणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जातो. आरटीओ कार्यालयाचे पथक ज्या वाहनांतून प्रवास करतात, त्या वाहनांची काय स्थिती आहे, याची पडताळणी ‘वाहन’ ‘परिवहन’ या संकेस्थळाच्या आणि मोबाइल ॲपच्या माध्यमातून करण्यात आली. तेव्हा आरटीओ कार्यालयाचीच काही वाहने पीयूसी आणि ‘इन्शुरन्स’विनाच धावत असल्याचे आढळून आले.

किती वर्षे इन्शुरन्सकडे दुर्लक्ष?एका वाहनाचे इन्शुरन्श २०११ नंतर नसल्याची ॲपची ऑनलाइन यंत्रणा दाखवित आहे, तर अन्य एका चारचाकीचा इन्शुरन्स २०२१ पर्यंत वैध होता, असे दर्शविते. ‘वाहन’ ‘परिवहन’ या संकेतस्थळावर इन्शुरन्शची स्थितीच दाखवत नाही. फिजिकली डाक्युमेंट पाहावे, अशी सूचना दर्शविली जाते.

काय आढळून आले?१) वाहन क्रमांक- एमएच-०४, इपी-२२००या चारचाकी वाहनाची नोंदणी २६ फेब्रुवारी २०१० मध्ये झालेली आहे. फिटनेसची मुदत २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आहे. परंतु, या वाहनाचे इन्शुरन्स आणि पीयूसी या दोन्हींची मुदत संपलेली आढळून आले. मोबाइल ॲपबरोबर शासनाचा संकेतस्थळावरून ही बाब समोर आली.२) वाहन क्रमांक- एमएच-०४, इपी-२०२०या चारचाकी वाहनाची नोंदणी २२ जून २०१० मध्ये झालेली आहे. या चारचाकीची २१ जून २०२५ पर्यंत फिटनेसची मुदत आहे. तसेच ८ जुलै २०२३ पर्यंत पीयूसीची मुदत आहे. परंतु, या वाहनांचे इन्शुरन्सच नसल्याचे दिसून आले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद