शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

वाहने सापडली, मालक हरवले!

By admin | Published: May 04, 2016 12:02 AM

बीड : हरवलेला, चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी पोलिसांच्या मागे एरवी लकडा लावावा लागतो; परंतु सध्या पोलीस यंत्रणा वेगळ्याच कारणाने त्रस्त आहे.

पोलिसांकडून शोधाशोध: जिल्ह्यात चार वर्षांत ४८४ वाहने आढळली बेवारसबीड : हरवलेला, चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळविण्यासाठी पोलिसांच्या मागे एरवी लकडा लावावा लागतो; परंतु सध्या पोलीस यंत्रणा वेगळ्याच कारणाने त्रस्त आहे. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ४८४ बेवारस वाहने आढळली आहेत. मात्र, मूळ मालकच सापडत नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून आता वाहनमालकांची शोधाशोध सुरु आहे. मागील चार वर्षांत विविध ठाण्यांतर्गत ही बेवारस वाहने पोलिसांना बेवारसस्थितीत सापडली आहेत. यापैकी काही वाहनांवर क्रमांकही नाहीत. त्यामुळे या वाहनांचे मूळ मालक शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. यापैकी काही वाहने अपघातातील असून काही वाहनांचा वापर अवैध धंद्यांसाठी व इतर गुन्ह्यांसाठी वापरली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. अनेकदा गुन्हेगार गुन्ह्यासाठी वाहनांचा वापर करतात, गुन्हा केल्यानंतर वाहने बेवारस स्थितीत सोडून पसार होतात. अशा वाहनांचाच यात सर्वाधिक भरणा आहे. ४८४ बेवारस वाहनांमध्ये चार चारचाकी तर चार तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. उर्वरित सर्व दुचाकी वाहने आहेत. मूळ मालकांनी कागदपत्रे सादर केल्यास त्यांना ही वाहने परत केली जाणार आहेत. बेवारसरित्या आढळलेल्या वाहनांची ओळख पटविणे सुरु आहे. त्यासाठी वाहनाचा प्रकार, पासींग, चेसीज, इंजीन क्रमांक आदीची माहिती पोलीस संकेतस्थळावर टाकली आहे. मूळ कागदपत्रांसह पोलीस प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)‘त्या’ वाहनांचा लिलावसध्या सर्व बेवारस वाहने विविध ठाण्यांमध्ये धूळखात आहेत. त्यामुळे ठाण्यांच्या आवारातील जागा गुंतून पडली आहे. शिवाय सुटे भाग चोरीला जाण्याचीही शक्यता आहे. वाहनांची ओळख पटविण्यासाठी महिन्याची मुदत आहे. त्यानंतर बेवारस वाहनांचा लिलाव केला जाणार आहे.