एकीकडे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागते, तर दुसरीकडे शहरासह तालुक्यात इमारतीच्या बांधकामावर लाखो लिटर सर्वाधिक टंचाई असतानाही ५० बांधकामेपाण्याची दुष्काळात उधळपट्टी होत आहे. आष्टी तालुक्यातील नागरिक गेल्या पाच वर्षांपासून पाणी टंचाईशी मुकाबला करीत आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने ११० छावण्या सुरू आहेत. तालुक्यातील १७२ गावांपैकी तब्बल ११९ गावे व ९१ वाड्या-वस्त्या तहानलेल्या आहेत. आष्टी शहरासह लगतच्या मुर्शदपूर, कडा, धानोरा, धामणगाव परिसरात घरे, इमारतींची बांधकामे जोमाने सुरू आहेत. मार्चअखेरमुळे शासकीय कामे करणाऱ्या गुत्तेदारांनी बिले काढण्यासाठी रस्ते व इमारतीच्या कामांचा सपाटा सुरू केला असून, आजघडीला आष्टी व मुर्शदपूर भागात एकूण ५० च्या वर बांधकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या परवानगीविनाच ही बांधकामे सुरू आहेत. आजघडीला तालुक्यातील एकूण बांधकामावर दररोज एक लाख लिटर पाण्याची उधळपट्टी होत आहे. तालुक्यातील पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन सुरू असलेली बांधकामे तात्काळ बंद करणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती
By admin | Published: March 30, 2016 12:19 AM