शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

धोरणात्मक निर्णय घेण्यास कुलगुरूंना बंधन?; ऐनवेळी व्यवस्थापन परिषदेची बैठक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 7:11 PM

धोरणात्मक निर्णय घेण्यास राज्यपाल कार्यालयाने बंधन घातल्याची माहिती सूत्रांनी दिली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा अल्प कालावधी राहिला असल्यामुळे नेमणुका, मोठी खरेदी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यास राज्यपाल कार्यालयाने बंधन घातल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची स्थगित बैठक शुक्रवारी आयोजित केली होती. ही बैठक घेण्यात येऊ नये, अशी मागणी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, संजय निंबाळकर, डॉ. राजेश करपे, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. नरेंद्र काळे आदींनी केली होती. मात्र सर्वांची मागणी धुडकावून बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी डॉ. सलामपुरे हे हिमाचल प्रदेश येथून हजर झाले. डॉ. काळे यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दर्शविला. बैठकीला  शुक्रवारी सकाळी सुरुवात होण्यापूर्वीच किशोर शितोळे यांनी आचारसंहिता भंग होण्याची शक्यता असून, बैठक घेणे नैतिकतेच्या विरोधात असल्याचे सांगितले. यानंतर कुलगुरूंनी कुलसचिवांना बैठक पुढे ढकलण्यात येत असल्याचे संदेश पाठविण्याचे आदेश दिले.

यानुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांना बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे संदेश सकाळी ११.२० वाजता पाठविण्यात आले. यावर सदस्य डॉ. शंकर अंभोरे यांनी आक्षेप घेतला. सर्व सदस्य आले आहेत, त्यांना टीए, डीएचा खर्च द्यावा लागणार, आचारसंहिता भंग होणार होती तर बैठक कशासाठी आयोजित केली? असा सवाल केला. यावरही कुलगुरूंनी बैठक रद्द करण्याची ठाम भूमिका घेतली. बैठक रद्द केल्यामुळे आचारसंहिता भंगाच्या तांत्रिक अडचणीपासून विद्यापीठ प्रशासनाची सुटका झाली. तसेच विद्यापीठाची होणारी बदनामी टळली असल्याची प्रतिक्रिया संजय निंबाळकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान सदस्य किशोर शितोळे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपाल तथा कुलपतींकडे निवेदन देऊन कुलगुरूंचा कार्यकाळ अल्प राहिला असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या नियुक्त्या, धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार राज्यपाल कार्यालयाने कुलगुरूंना कोणतेही धोरणात्मक निर्णय न घेण्याची सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आलेल्या पत्रालाही कुलगुरूंच्या कार्यालयाने उत्तर दिले. मात्र त्यानंतरही धोरणात्मक निर्णय, नेमणुका न करण्याची भूमिका कुलपती कार्यालयाने घेतली. यामुळे शुक्रवारी आयोजित केलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीला या पत्राची किनार असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.

कुलसचिव, परीक्षा संचालकांच्या मुलाखती थंडबस्त्यातविद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलसचिव नेमण्यासाठी मुलाखती आयोजित करण्याच्या हालचाली सुरूहोत्या. पाच वर्षे पूर्णवेळ कुलसचिव नेमण्यात आलेला नसताना महिनाभरापेक्षा कमी कालावधी राहिला असता कुलसचिव नेमू नये, अशी आग्रही भूमिका व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे यांच्यासह इतरांनी घेतली होती. तरीही दोन वेळा व्यवस्थापन परिषदेची बैठक आयोजित करून कुलसचिव निवड समितीवर एका सदस्याची निवड करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र शुक्रवारी आयोजित केलेली बैठक रद्द झाल्यामुळे कुलसचिव, परीक्षा संचालकपदाच्या मुलाखती रद्द झाल्यात जमा असल्याचे स्पष्ट झाले.

कुलगुरूंनी आदेश दिल्यामुळे व्यवस्थापन परिषदेची बैठक रद्द करण्यात आली. ही बैठक का रद्द करण्यात आली, याची माहिती नाही. कुलगुरूंच्या आदेशाप्रमाणे सदस्यांना संदेश पाठविण्यात आले. तसेच कुलपती कार्यालयाचे काही दिवसांपूर्वी एक पत्र आले होते. त्यानंतर पुन्हा कोणते पत्र आले का,  याची माहिती नाही.- डॉ. साधना पांडे, प्रभारी कुलसचिव 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र