सोयगाव : तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतींमध्ये ३६४ सदस्यांपैकी २३४ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. या निवडणुकीत महिलांनी बाजी मारली असून, पन्नास टक्के ग्रामपंचायतींवर महिलांच्या हाती कारभाराची दोरी असणार आहे.
सोयगाव तालुक्यात चाळीसपैकी ३६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. यामध्ये २३४ जागांवर महिला सदस्यांची वर्णी लागली आहे. मात्र, राखीव प्रवर्गासाठी महिला सदस्यांची कमी असल्याने त्या गावांमध्ये सरपंच पदाची चिंता उभी राहिली आहे. अनुसूचित जातीसाठी केवळ सात जागांवर महिला सदस्य निवडून आल्या आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गात २३, नागरिकांचा मागास प्रवर्गात ४७ आणि सर्वसाधारणसाठी १२३ महिला सदस्य निवडून आल्या आहेत. मात्र, अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतीसाठी महिला सदस्य नसल्यास त्या ठिकाणी सरपंच पदाची मोठी चिंता उभी राहणार आहे.