मागील पंचवार्षिकला या ग्रामपंचायतीवर काँग्रेस मित्रपक्षाचीच सत्ता होती, तर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपच्या सहा जागा होत्या. मात्र या निवडणुकीत काँग्रेस मित्र पक्षाच्या ग्रामविकास एकता महाआघाडीच्या पॅनलने ग्रामपंचायतीवर सत्ता टिकवून ठेवण्यात यश मिळविले. ग्रामविकास एकता महाआघाडीच्या आठ उमेदवारांचा निवडणुकीत विजय झाला, तर शेतकरी कष्टकरी ग्रामविकास पॅनल उमेदवारांना सात उमेदवारांचा विजय झाला.
हे आहेत विजयी उमेदवार : शेख रजाक, राणी तोरडमल, शेख आतियाबी नबाब, गोपाळ वाघ, शीलाबाई शिनगारे, सवाती जैन, डॉ. सुहास वायकोस, प्रतिभा पांडे, पठाण पकिजा साबेर, पांडूरंग मंदाडे, कविता दुधे, शुभम गंगावणे, काकाजी कोलते, शिवराम म्हस्के, कांचनबाई कोलते यांचा विजय झाला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शिवराम म्हस्के यांचाही विजय झाला. त्यांच्याविरुद्ध पुतण्या उभा होता.
फोटो : वडोद बाजार येथील ग्रामविकास एकता महाआघाडीच्या विजय उमेदवार जल्लोष साजरा करताना.