दहा वर्षे आमदारकी व ग.सह.सा. कारखान्यामुळे जामगाव (रघुनाथनगर) नेहमीच तालुक्याच्या राजकारणात चर्चेत असते. अण्णासाहेब माने शिवसेनेकडून १० वर्ष आमदार असतांना प्रत्येक निवडणुकीत त्यांची लढाई राष्ट्रवादीच्या कुंडलिकराव माने गटाविरुद्ध असायची. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मुलगा संतोष यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे दोन्ही माने गटाचे मनोमिलन झाले. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पहिल्यांदाच एकत्र येत कॅप्टन प्रशांत माने यांच्या नेतृत्वाखाली 'जगदंबा महाविकास आघाडी' पॅनलची स्थापना करून एक जागा बिनविरोध काढत विजयाच्या दिशेने पाऊल टाकले होते. त्याविरुद्ध गावातील विनोद काळे, लक्ष्मण सांगळे, बशीर पटेल व संपत रोडगे यांनी एकत्र येत ‘शिवशाही विकास पॅनल’ची स्थापना करून ‘मानेशाही’विरोधात प्रचार करून उर्वरित १४ पैकी ११ जागेवर दणदणीत विजय मिळवला.
जामगावात शिवशाही विकास पॅनलचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:06 AM