शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

Video - औरंगाबादच्या वरुड काजीमध्ये मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिमांची एकत्रित एकादशी दिंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 11:49 AM

वरुड येथील हिंदू मुस्लिम बांधवांनी एक आदर्श समाजापुढे निर्माण केल्याची चर्चा परिसरात रंगली होती.

करमाड - औरंगाबाद तालुक्यातील वरूड काजी येथे हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात व आनंदात विठ्ठल रुक्माईची दिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली. मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद हा सण व व हिंदू धर्माची पवित्र अशी आषाढी एकादशी हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी आल्याने वरुड येथील मुस्लिमांच्या वतीने या दिवशी कुर्बानी देण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे वरुड येथील सरपंच दिलावर बेग यांनी सांगितले.

​रविवारी आषाढी एकादशी निमित्त औरंगाबाद तालुक्यातील बहुसंख्य गावात ग्रामस्थांच्या वतीने तसेच शाळा, खासगी शिकवणी अशा विविध संस्थांच्या वतीने दिंडी काढून, तुकोबारायाचे अभंग वाचून , विठूरायाचा गजर करत मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. औरंगाबाद तालुक्यातील वरूड काजी येथे हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी व रमजान ईद साजरी करून हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकोपाचा मोठा संदेश औरंगाबाद तालुका जिल्हा सह इतर सर्वांना दिला. यानिमित्ताने वरुड येथील हिंदू मुस्लिम बांधवांनी एक आदर्श समाजापुढे निर्माण केल्याची चर्चा परिसरात रंगली होती.

वरुड काजी येथे चिकलठाणा पोलीस स्टेशनच्या वतीने मागील चार दिवसांपूर्वी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद हा सण आल्यामुळे मुस्लिमांच्या वतीने कुर्बानी देण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात येणार असून हिंदू धर्मियांच्या भावनेचा आदर करून हा निर्णय घेण्यात आला. असे वरुडचे सरपंच दिलावर बेग यांनी जाहीर केले होते व त्या दृष्टीने वरुड काजी येथे कुर्बानीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला व हिंदू मुसलमान बांधवांनी एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात एकादशी व बकरी ईद साजरी केली. यावेळी चिकलठाणा ग्रामीण पोलीस ठण्याचे कर्मचारी व अधिकारी यांनी देखील दिंडीत टाळ घेऊन भजन गात सहभाग नोंदवला. 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीAurangabadऔरंगाबादHinduहिंदूMuslimमुस्लीम