शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

VIDEO :शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांना व्यापा-यांची मारहाण

By admin | Published: June 01, 2017 10:50 AM

ऑनलाइन लोकमत  औरंगाबाद, दि. 1 - राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण प्राप्त झालं ...

ऑनलाइन लोकमत 
औरंगाबाद, दि. 1 - राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने शेतक-यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. 
 
औरंगाबादच्या जाधववाडी मार्केटमध्ये शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शंभराहून अधिक शेतकरी बाजार बंद करण्याचे आवाहन करीत होते.  त्याच दरम्यान एका ट्रकची टायरमधील हवा सोडत असताना व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांवर हल्ला केला.
(शेतकऱ्यांचा संप सुरू; दूध-भाजीपाला बंद!)
 
यात जयाजीराव सूर्यवंशी यांच्यासह 5 शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली, तर काही शेतकरी तेथून निघून गेले.  या घटनेमुळे औरंगाबादेत गोंधळ निर्माण झाला आहे. 
 
संपाच्या पहिल्या दिवशी जवळपास अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत बाजाराकडे  पाठ फिरवली . ज्या शेतकऱ्यांना आंदोलनाची माहिती नव्हती, ते शेतकरी उद्या संपामध्ये सहभागी होत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध केला तरी आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीय. या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो, कांदे फेकत बाजार बंद करण्याचा प्रयत्नही केला.
 

 

कशी ठरली संपाची दिशा?
पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी ३ एप्रिलला ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. ‘किसान क्रांती’ समन्वय समितीने बुधवारी पुणतांब्यात संपाची घोषणा केली. ४०हून अधिक संघटना संपात उतरल्या असल्याचे समन्वय समितीचे धनंजय जाधव, धनंजय धोरडे, जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. शरद जोशी व रघुनाथ पाटील प्रणीत शेतकरी संघटना, खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी व संजीव भोर यांची ‘शिवप्रहार’ संघटना संपात उतरल्या आहेत.  
 
बाजार समित्यांच्या फेडरेशनचे अध्यक्ष माजी आ. दिलीप मोहिते यांनीही बाजार समित्यांच्या वतीने संपाला पाठिंबा जाहीर केला. नेवासा बाजार समितीने बंद जाहीर केला आहे. पुण्यात डॉ. बाबा आढाव यांनी हमाल मापाडी संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे. नगर जिल्ह्याच्या फर्टिलायझर असोसिएशननेही कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
 
मुंबई, नवी मुंबईचे धान्य कोठार म्हणून मुंबई बाजार समितीची देशभर ओळख आहे. रोज दोन ते अडीच हजार वाहनांमधून कृषीमाल येतो. यामध्ये भाजी मार्केटमध्ये ४०० ते ५०० ट्रक, फळ मार्केटमध्ये २५० ते ३०० ट्रक, कांदा मार्केटमध्ये २०० ते ३५० वाहनांमधून माल येतो.
 
उर्वरित आवक धान्य व मसाला मार्केटमध्ये होत असते. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या व्यवहारांवर फारसा परिणाम होणार नाही, असे बाजार समितीचे सचिव शिवाजी पहिनकर यांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातून माल येथे विक्रीसाठी येत असतो. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा थेट परिणाम येथील व्यवसायावर होणार नाही.
 
भाजी व फळ मार्केटमधील आवकही सुरळीत राहील, असे ते म्हणाले. फळ मार्केटचे व्यापारी संजय पानसरे यांनीही संपाचा परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सद्यस्थितीमध्ये चिक्कू, सीताफळ, काही प्रमाणात आंबे वगळता इतर सर्व फळे परराज्यातून येत आहेत. यामुळे मार्केट सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.
 

भाजी मार्केटमध्ये गुजरात व इतर ठिकाणांवरून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे. गुरुवारी सर्वच व्यापाऱ्यांनी माल मागविला आहे. सातारा, सांगली परिसरात आंदोलनामुळे माल येण्यास विरोध झाल्यास थोडाफार परिणाम होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

 

शिवसेनेचा पाठिंबा

उद्धव ठाकरे यांनी समन्वय समितीच्या नेत्यांना मुंबईला बोलविले होते. त्यानंतर माजी मंत्री बबनराव घोलप, खा. सदाशिव लोखंडे यांनी पुणतांब्यात येऊन पाठिंबा जाहीर केला.

 

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शेतमालाला हमीभाव व कर्जमुक्तीसाठी आंदोलन केले होते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवून आणला होता. ११ आॅक्टोबरला बैठक घेणार होते. मात्र सरकार फसवे असल्याचे सिद्ध झाले आहे.